AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup 2022: इंग्लंडची वाट लावणारा राज बावा कोण आहे?

वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्डकप (Under19 world cup) स्पर्धेत मध्यमगती गोलंदाज राज बावाच्या (Raj bawa) भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे.

U19 World Cup 2022: इंग्लंडची वाट लावणारा राज बावा कोण आहे?
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 8:30 PM
Share

अँटिग्वा: वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्डकप (Under19 world cup) स्पर्धेत मध्यमगती गोलंदाज राज बावाच्या (Raj bawa) भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे. राज बावाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन इंग्लंडची (India vs England) वाट लावून टाकली आहे. आतापर्यंत त्याने इंग्लंडच्या वरच्या फळीतील चार फलंदाजांना तंबुची वाट दाखवली आहे. दमदार फलंदाजी करणारा जॉर्ज थॉमस, विलियम लिक्सटन, जॉर्ज बेल आणि रेहान अहमदची विकेट त्याने काढली. जॉर्ज थॉम्स 27 धावांवर बाद झाला. राज बावाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात थॉम्स झेलबाद झाला. कॅप्टन यश धुलने त्याचा झेल घेतला. बावाने विलियम लिक्सटन अवघ्या चार धावांवर यष्टीरक्षाकरवी झेलबाद केले. बावाने जॉर्ज बेलला भोपाळाही फोडू न देता शुन्यावर यष्टीरक्षाकरवी झेलबाद केले. दहा धावांवर खेळणाऱ्या रेहान अहमदला त्याने स्लीपमध्ये कौशल तांबेकरवी झेलबाद केले. राज बावाचं हे तुफान इंग्लंडच्या संघाला अजिबात झेपत नाहीय.

कोण आहे राज बावा राज बावा मध्यमगती गोलंदाजी करणारा ऑलराऊंडर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या होत्या. युगांडाविरोधात त्याने 108 चेंडूत 162 धावांची खेळी केली होती. यात चौदा चौकार आणि आठ षटकार लगावले. राज बावा अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत एकाडावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 2004 मधला स्कॉटलंड विरुद्ध 155 धावांचा शिखर धवनचा विक्रम मोडीत काढला होता.

युवराज सिंग आदर्श राज बावाने युवराज सिंगला पाहून बॅटिंग स्टान्समध्ये बदल केला. माझ्या वडिलांच्या कोचिंग सेंटरमध्ये मी युवराजला फलंदाजी करताना पाहायचो, अशी आठवण राजने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितली. राजची कौटुंबिक पार्श्वभूमी खेळाची आहे. त्याचे आजोबा तारलोचन बावा 1948 सालच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या हॉकी संघाचे कॅप्टन होते.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...