AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: वर्ल्ड कपमध्ये इंडिया-पाकिस्तान सामना नाही, आयसीसीचा निर्णय

U19 World Cup 2025: आयसीसीने घेतलेल्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे. आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीत सामना होणार नाही. दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात असल्याने तसं शक्य नाही.

IND vs PAK: वर्ल्ड कपमध्ये इंडिया-पाकिस्तान सामना नाही, आयसीसीचा निर्णय
india and pakistan (प्रातिनिधिक छायाचित्र) Image Credit source: PTI
| Updated on: Aug 18, 2024 | 8:47 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संघर्षांमुळे दोन्ही देशाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाहीत. दोन्ही संघ हे केवळ आयीसीसी आणि आशिया कप स्पर्धेतच आमनेसामने येतात. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आयसीसीच्या स्पर्धेची प्रतिक्षा असते. मात्र आयसीसी स्पर्धेत आता टीम इंडिया-पाकिस्तान सामना होणार नाही. आयसीसीने अंडर 19 वूमन्स टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यामध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहेत. त्यामुळे उभयसंघात साखळी फेरीत सामना होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

वूमन्स अंडर 19 टी वर्ल्ड कप स्पर्धेला 18 जानेवारी 2025 पासून सुरुवात होणार आहे. वूमन्स अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या मलेशियाकडे यजमानपदाचा मान आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 41 सामने होणार आहेत. तर अंतिम सामना हा 2 फेब्रुवारीला होणार आहे. तर 13 ते 16 जानेवारी दरम्यान सराव सामने आयोजित करण्यात आले आहेत. तर समोआची आयसीसी स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. समोआने याआधी कोणत्याही गटातील आयसीसी स्पर्धा खेळलेली नाही. या स्पर्धेच्या आयोजनाचा मान हा थायलँडकडे होता, मात्र त्यांनी माघार घेतली.

थोडक्यात पण महत्त्वाचं

या स्पर्धेतील सहभागी 16 संघांना 4-4 नुसार गटात विभागण्यात आलं आहे. थोडक्यात काय तर प्रत्येक गटात 4 संघ आहेत. गतविजेता टीम इंडियासह ए ग्रुपमध्ये वेस्टइंडिज, श्रीलंका आणि यजमान मलेशियाचा समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये पराकिस्तान, इंग्लंड, आयर्लंड आणि अमेरिकेचा समावेश आहे. सी ग्रुपमध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका समोआ आणि अफ्रिका क्वालिफायरमधील एक संघाचा समावेश असणार आहे.

असं आहे अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक

या स्पर्धेतील सर्व सामने हे 4 ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. ए ग्रुपमधील सर्व संघांचे सामने हे सेलांगोरमधील बयूमास ओवल क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत. फायनलही इथेच खेळवण्यात येणार आहे. तर बी ग्रुपमधील सामन्यांचं आयोजन हे डॉ हरजीत सिंह जोहोर स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.