
IND vs PAK, U19 World Cup 2026: अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान हा सामना 1 फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना भारतापेक्षा पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यातील कामगिरीवर त्यांचं उपांत्य फेरीचं गणित सुटणार आहे. पण हे गणित वाटते तितसं सोपं नाही. असं असताना या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. कारण वैभव सूर्यवंशीची बॅट या सामन्यात चालली तर भारत हा सामना सहज जिंकेल. पण वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानविरुद्ध रेकॉर्ड कसा आहे? कारण वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानविरुद्ध अंडर 19 वनडे सामने फार काही खेळले नाहीत. भारत पाकिस्तान लढती झाल्या तरी मल्टी नेशन स्पर्धेतच होतात. अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा मल्टी नेशन स्पर्धा आहे. त्यामुळे या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पाकिस्तानविरुद्ध आपली ताकद दाखण्याची एक मोठी संधी आहे.
वैभव सूर्यवंशी पाकिस्तानविरुद्ध अंडर 19 वनडेत 3 सामने खेळला आहे. आता चौथा वनडे सामना असणार आहे. पण मागच्या तीन सामन्यात त्याची कामगिरी हवी तशी झाली नाही. वैभव सूर्यवंशीने 3 सामन्यात 10.66 च्या सरासरीने 32 धावा केल्या. मागच्या तीन सामन्यात त्याची सर्वोत्तम खेळी ही 26 धावांची आहे. मागच्या सामन्यात त्याने या धावा केल्या होत्या. या धावा त्याने भारत पाकिस्तान अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत केल्या होत्या. या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे त्याला चौथ्या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कारण त्याच्या कामगिरीवर टीम इंडियाचं या सामन्याचं विजयाचं गणित सुटणार आहे.
टीम इंडिया पाकिस्तानसोबत खेळण्यास तयार आहे. हा एक सामान्य सामना म्हणून भारतीय खेळाड पाहात आहेत. वैभव सूर्यवंशीसोबत खेळणाऱ्या पाच खेळाडूंनी या सामन्याबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. सर्वांचा हेतू स्पष्ट आहे की आपलं सर्वोत्तम या सामन्यात द्यायचं आहे. वैभव सूर्यवंशीसह कर्णधार आयुष म्हात्रे, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू, दीपेश देवेंद्रन आणि हेनिल पटेल यांच्या कामगिरीवर लक्ष असेल.
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 10 सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघाचं विजयाचं गणित 5-5 असं आहे. त्यामुळे दोन्ही संघात तूल्यबल लढत आहे. आता 1 फेब्रुवारीला कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागून आहे.