AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup: वडीलांनी शेती, जीम विकून गोंगाडी त्रिशाला बनवलं क्रिकेटर, आई-वडीलांचा मोठा संघर्ष

U19 World Cup: भारताला विश्वविजेता बनवून मुलीने फेडलं कर्ज. या प्रवासात आई-वडीलांना किती अडचणी आल्या त्या जाणून घ्या. तिचं क्रिकेटर बनण्याच स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सिकंदराबाद येथे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.

U19 World Cup: वडीलांनी शेती, जीम विकून गोंगाडी त्रिशाला बनवलं क्रिकेटर, आई-वडीलांचा मोठा संघर्ष
gongadi trisha
| Updated on: Feb 01, 2023 | 8:38 AM
Share

ICC Under-19 Cricket World Cup 2023 : दहा वर्षांपूर्वी गोंगाडी रेड्डी यांनी आपली जीम बंद करण्याचा आणि फिटनेस ट्रेनरची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आपलं एकमेव अपत्य गोंगाडी त्रिशाच क्रिकेटपटू बनण्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी इतका कठोर निर्णय घेतला. तत्कालीन आंध्र प्रदेशच्या भद्रादी कोठागुडेम जिल्ह्यातील भद्राचलम येथे गोंगाडी रेड्डी यांची जीम होती. गोंगाडी रेड्डी स्वत: हॉकी प्लेयर होते. अंडर-16 हॉकी टुर्नामेंटमध्ये त्यांनी भारतीय हॉकी टीमच प्रतिनिधीत्व केलय.

फायनलमध्ये गोंगाडी त्रिशाने किती रन्स केल्या?

गोंगाडी रेड्डी यांनी मुलीच्या क्रिकेट प्रशिक्षणासाठी जीम बंद करण्याचा निर्णय घेतला. चार एकरमध्ये पसरलेली शेती सुद्धा विकली. रविवारी 29 जानेवारी 2023 रोजी हैदराबादची ही युवा क्रिकेटर 24 रन्सची इनिंग खेळली. सौम्या तिवारीसोबत गोंगाडी त्रिशाने 46 धावांची भागीदारी केली. महिला अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोंगाडी त्रिशाच्या या धावा महत्त्वपूर्ण ठरल्या. टीम इंडियाने पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला हा टी 20 वर्ल्ड कप जिंकला.

क्रिकेटसाठी सिकंदराबादला शिफ्ट झालो

“मी फिटनेसचा व्यवसाय आणि नोकरी करण्याआधी राज्याच्या अंडर-16 हॉकी टीममध्य खेळायचो. मी हॉकीसोबत क्रिकेटही खेळायचो. माझ्या मुलीने क्रिकेट खेळावं अशी माझी इच्छा होती. त्रिशा सुरुवातीला भद्राचलम येथे क्रिकेट खेळायची. तिचं क्रिकेटर बनण्याच स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सिकंदराबाद येथे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला” असं गोंगाडी रेड्डी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले.

अशा विजयासाठी मी कुठलही नुकसान पचवीन

“याच कारणामुळे मला जीम बाजारभावापेक्षा 50 टक्के कमी किमतीला एका नातेवाईकाला विकावी लागली. त्यानंतर मुलीच्या ट्रेनिंगसाठी मी 4 एकर शेती विकली. भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप विजयात, तिला जिंकताना पाहणं हे त्रिशाच्या क्रिकेटबद्दलच्या तळमळीच फळ आहे. अशा विजयासाठी मी कुठलही नुकसान पचवायला तयार आहे” असं गोंगडी रेड्डी यांनी सांगितंल.

कार्टुन ऐवजी क्रिकेट सामने दाखवले

आयटीसीमध्ये नोकरी आणि जीम चालवत असल्याने गोंगडी रेड्डी अनेकदा रात्री उशिरा घरी यायचे. त्रिशाने टीव्हीवर कार्टुन ऐवजी क्रिकेट मॅच पाहावी, यासाठी गोंगडी रेड्डी आणि त्यांची पत्नी माधवी प्रयत्न करायचे. जुन्या दिवसांची आठवण सांगताना गोंगडी रेड्डी म्हणाले की, “त्रिशाचा जन्म झाला, तेव्हा मी पत्नीला सांगितलं होतं. त्रिशा जेव्हा टीव्ही पहायला सुरुवात करेल, तेव्हा आपण तिला कार्टुन ऐवजी क्रिकेट सामने दाखवू” वडीलांनी अशी दिली कोचिंग

“त्रिशा अडीच वर्षांची झाली, तेव्हा मी तिला प्लास्टिकची बॅट आणि बॉल आणून दिल्याची आठवण त्यांनी सांगितली. पाच वर्षांची असताना, मी तिला सोबत जीममध्ये घेऊन जायचो. तिला 300 पेक्षा जास्त थ्रो डाऊन चेंडूंचा सराव द्यायचो. त्यानंतर मी स्थानिक मैदानात सिमेंटची विकेट बनवली. त्यानंतर मी नोकरी आणि जीमपेक्षा जास्तवेळ त्रिशाच्या कोचिंसाठी द्यायचो” असं गोंगाडी रेड्डी म्हणाले.

Follow Us
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...