VIDEO : काय तो वेग, काय ती खेळी, Umesh Yadavनं सर्वाधिक विकेट्स घेत प्रतिस्पर्ध्यांना दम भरला, इंग्लंडमध्ये चर्चा

| Updated on: Aug 15, 2022 | 8:06 AM

रविवारी 14 ऑगस्टला क्रिकेटपटू उमेश यादव यानं धावांच्या प्रति षटक 6 पेक्षा कमी धावा देत चांगली गोलंदाजी केली. सॉमरसेटविरुद्धच्या या सामन्यात उमेशने 10 षटकांत 58 धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या.

VIDEO : काय तो वेग, काय ती खेळी, Umesh Yadavनं सर्वाधिक विकेट्स घेत प्रतिस्पर्ध्यांना दम भरला, इंग्लंडमध्ये चर्चा
उमेश यादव नाही, हा खेळाडू टीम इंडियामध्ये जागा घेण्यास पात्र होता, पण...
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : सध्या इंग्लंडमध्ये (England) क्रिकेटचा धमका सुरू आहे, क्रिकेटच्या स्पर्धाच स्पर्धा सुरू आहेत. द हंड्रेड (The hundred) आणि रॉयल लंडन वन डे चषक सारख्या स्पर्धा एकाच वेळी होत असून क्रिकेट चाहत्यांचे भरपूर मनोरंजन होत आहे. इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये फार कमी भारतीय खेळाडू खेळताना दिसत असले तरी यावेळी परिस्थिती वेगळी आहे. विशेषत: एकदिवसीय स्पर्धेत अनेक प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू आपली चमक दाखवत आहेत. यामध्ये टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) आहे, ज्याच्या स्पीडने या स्पर्धेत आग लावली आहे. गेल्या महिन्यात टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या उमेश यादवला त्यावेळी कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण, इंग्लंडच्या कौंटी क्लब मिडलसेक्सने त्याला करारबद्ध केले आणि मैदानावर त्याची चमक दाखवण्याची संधी दिली. तेव्हापासून उमेशने दहशत निर्माण केली होती. विशेषतः रॉयल लंडन वन डे चषकात त्याने असा कहर केला आहे की, फलंदाजांना क्रीझवर टिकणे कठीण झाले आहे.

हा व्हिडीओ पाहा

स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स

मिडलसेक्सकडून खेळताना उमेशनं आतापर्यंत या स्पर्धेतील 5 सामन्यांत मैदानात उतरून स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. 34 वर्षीय अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाजाने या 5 सामन्यांमध्ये 17 च्या सरासरीने आणि 18 च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने सर्वाधिक 15 बळी घेतले आहेत. यापैकी उमेशनं एका डावात 5 विकेट्स घेण्याचा चमत्कारही केला आहे.

हा व्हिडीओ पाहा

मिडलसेक्सने या 5 पैकी 4 सामने जिंकले

उमेशच्या या कामगिरीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर मिडलसेक्सने या 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. संघाला हंगामातील केवळ पहिल्याच सामन्यात विजय मिळवता आला नाही, ज्यामध्ये उमेशला केवळ 1 बळी घेता आला.

सेंच्युरियन फलंदाजांचा ढीग पडला

रविवारी 14 ऑगस्ट रोजी उमेश यादवनं धावांच्या प्रति षटक 6 पेक्षा कमी धावा देत चांगली गोलंदाजी केली. सॉमरसेटविरुद्धच्या या सामन्यात उमेशने 10 षटकांत 58 धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. या दोन्ही विकेट सलामीवीरांच्या होत्या, त्यापैकी एकाने शानदार शतकही केले. मिडलसेक्सने 336 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 1 गडी राखून विजय मिळवला.