Team India : रोहितच्या नेतृत्वात बुमराहसारखाच दुसरा घातक बॉलर 2 वर्षापासून फक्त सिलेक्शनची वाट पाहतोय

Team India : टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा या गुणी गोलंदाजाने आपला दबदबा निर्माण केला होता. पण आता त्याचं नाव कोणाच्याही लक्षात नाहीय.

Team India : रोहितच्या नेतृत्वात बुमराहसारखाच दुसरा घातक बॉलर 2 वर्षापासून फक्त सिलेक्शनची वाट पाहतोय
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 8:41 AM

Team india : टीम इंडियाने नुकतीच ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने विजय मिळवला. त्याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता टीम इंडिया 3 वनडे सामन्यांच्या सीरीजची तयारी करतेय. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. त्या दृष्टीने टीम इंडियाची बांधणी सुरु आहे. अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंना आलटून-पालटून संधी दिली जातेय.

जेणेकरुन वर्ल्ड कपसाठी योग्य संघ निवडता यावा. टीम इंडियाची मॅनेजमेंट वनडे वर्ल्ड कपची रणनिती बनवत असताना त्यांना एका गोलंदाजाचा विसर पडलाय.

कधी मिळणार संधी?

या स्टार भारतीय गोलंदाजाच नाव आहे टी नटराजन. तो सध्याच्या घडीला दूर-दूर पर्यंत टीम इंडियाच्या रणनितीचा भाग नाहीय. टी. नटराजन बऱ्याच काळापासून टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. टी नटराजनने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली करिअरची सुरुवात केली होती. पण रोहितच्या नेतृत्वाखाली मागच्या दोन वर्षांपासून तो फक्त संधीची प्रतिक्षा करतोय.

तरीही, टीम इंडियाचे दरवाजे उघडले नाहीत

नटराजनला टीमच्या बाहेर जाऊन दोन वर्षांपेक्षा पण जास्त काळ लोटलाय. नटराजनने करिअरच्या सुरुवातीला यॉर्कर मॅन म्हणून स्वत:ची ओळख बनवली होती. टी नटराजनने आयपीएल 2022 मध्ये सनरायजर्स हैदराबाद टीमच प्रतिनिधीत्व केलं. त्यावेळी त्याने कमालीचा खेळ दाखवला. टी. नटराजनने आयपीएल 2022 मध्ये 11 मॅचेसमध्ये 18 विकेट काढल्या. पण तरीही, त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले नाहीत.

डेब्यु कधी केला?

नटराजनने ऑस्ट्रेलियात टीम इंडियासाठी डेब्यु केला होता. या दौऱ्यात त्याने तिन्ही फॉर्मेट्समध्ये आपला पहिला सामना खेळला होता. टी. नटराजनने मार्च 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला. टी. नटराजन डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या या मुलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अल्पकालावधीत आपली छाप उमटवली. पण आता फक्त त्याच्या नशिबी वाट पाहण आलय. किती विकेट घेतल्यात?

नटराजन भारतासाठी 1 टेस्ट मॅच, 4 टी 20 इंटरनॅशनल मॅच आणि 2 वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळला. टी. नटराजनने टेस्टमध्ये 3 विकेट, टी 20 इंटरनॅशनलमध्ये 7 विकेट आणि वनडेमध्ये 3 विकेट त्याच्या नावावर आहेत.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.