
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत आरसीबीच्या पदरी निराशा पडली आहे. युपी वॉरियर्सकडून पराभव झाल्याने स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. युपी वॉरियर्सनंतर स्पर्धेतून बाद होणार दुसरा संघ ठरला आहे. नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. स्पर्धेतील ट्रेंडप्रमाणे दुसऱ्या डावात धावा गाठणं सहज शक्य होतं. पण तसं या सामन्यात झालं नाही. युपी वॉरियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुपुढे २२६ धावांचं तगडं आव्हान दिलं. हे आव्हान काही आरसीबीला गाठता आलं नाही. विजयाच्या दृष्टीने आरसीबीने सर्वोतोपरी प्रयत्न केलं. मात्र शेवटी १२ धावा तोकड्या पडल्या. स्नेह राणाने शेवटी फलंदाजीला येत जोरदार फटकेबाजी केली. पण विजयी लक्ष्य काही गाठता आलं नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ २१३ धावांवर आटोपला. युपी वॉरियर्सकडून सोफिया एक्सलटोनने ३, दीप्ती शर्माने ३, चिनले हेन्रीने २ आणि अंजली सरवानीने १ गडी बाद केला.
युपी वॉरियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केल्याने गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स सुपर ३ मध्ये क्वॉलिफाय झाली आहे. आता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात थेट अंतिम फेरीत जाण्यासाठी चुरस असणार आहे. मुंबई इंडियन्सने उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर थेट अंतिम फेरी गाठेल. युपी वॉरियर्सची कर्णधार दीप्ती शर्मा म्हणाली की, आम्हाला फक्त आमच्या पायांवर उभे राहायचे होते कारण टी२० मध्ये तुम्हाला कधीच कळत नाही. आज संपूर्ण सांघिक प्रयत्न होता. मी माझ्या स्टॉक बॉल आणि व्हेरिएशनसह स्वतःला आधार देत होतो. कधीकधी ते यशस्वी होते, कधीकधी नाही. आम्हाला चांगली सुरुवात मिळत आहे पण मधल्या सामन्यात यश मिळाले नाही.जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्हाला सर्वकाही सकारात्मक दृष्टिकोनातून दिसते. अर्थातच आम्ही पात्र ठरलो नाही याबद्दल निराशा झाली. आशा आहे की आम्ही पुढच्या वर्षी चांगले करू.
यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वॉल, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा (कर्णधार), चिनेल हेन्री, श्वेता सेहरावत, पूनम खेमनार, उमा चेत्री (विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, क्रांती गौड, अंजली सरवानी.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, शार्लोट डीन, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर.