USA vs IND: टीम इंडियाची Super 8 मध्ये धडक, आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध ‘सामना’

IND vs AUS Super 8 T20 World Cup 2024: टीम इंडियाने साखळी फेरीत सलग 3 विजय मिळवून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.

USA vs IND: टीम इंडियाची  Super 8 मध्ये धडक, आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना
ind vs aus super 8 t20 world cup 2024
| Updated on: Jun 13, 2024 | 2:18 AM

भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी 12 जून रोजी यजमान संघ यूएसएवर 7 विकेट्सने मात करत आपला सलग तिसरा विजय मिळवला. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 111 धावांचं आव्हान हे 3 विकेट्स गमावून 10 बॉलआधी पूर्ण केलं. टीम इंडियाने 18.2 ओव्हरमध्ये 3 बाद 111 धावा केल्या. सूर्यकुमार यादव 50* आणि शिवम दुबे याने नाबाद 31 धावा केल्या. तर त्याआधी अर्शदीप सिंह याने 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे यूएसएला 110 धावांवर रोखण्यात यश आलं. अर्शदीपला त्याच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

टीम इंडिया या विजयी हॅट्रिकसह सुपर 8 मध्ये पोहचली आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियानंतर टीम इंडियाने सुपर 8 मध्ये पोहचणारी तिसरी टीम ठरली आहे. आता पुढील काही सामन्यांमध्ये उर्वरित 5 जागांसाठी एकूण 4 गटातील संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाच्या सुपर 8 मधील प्रवेशासह या फेरीतील सामनाही निश्चित झाला आहे. टीम इंडियाचा सुपर 8 मधील सामना हा आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने

दरम्यान टीम इंडिया आपल्या साखळी फेरीतील अखेरचा सामना हा कॅनडा विरुद्ध 15 जून रोजी खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया सुपर 8 राउंडला सुरुवात करणार आहे. टीम इंडिया सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना हा 24 जून रोजी डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लूसिया येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने

युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: आरोन जोन्स (कर्णधार), स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.