IND vs PAK: उस्मान तारीकचा प्रश्न आणि सूर्यकुमार यादवने ताडकन दिलं उत्तर, त्याच्यासाठी आम्ही…

भारत पाकिस्तान सामना कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानातील खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी आहे. त्यामुळे पाकिस्तानचा उस्मान तारीक भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे. याबाबत कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की...

IND vs PAK: उस्मान तारीकचा प्रश्न आणि सूर्यकुमार यादवने ताडकन दिलं उत्तर, त्याच्यासाठी आम्ही...
IND vs PAK: उस्मान तारीकचा प्रश्न आणि सूर्यकुमार यादवने ताडकन दिलं उत्तर, त्याच्यासाठी आम्ही...
Image Credit source: PTI/Money 9 वरून
| Updated on: Feb 14, 2026 | 9:38 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानच्या उस्मान तारीकच्या गोलंदाजीची स्तुती होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण त्याची गोलंदाजी शैली आणि चेंडू टाकण्याची पद्धत यामुळे फलंदाजांना फटका मारताना अडचण येते. चेंडू टाकण्यापूर्वी थांबणं आणि साइड आर्म एक्शनसह चेंडू सोडणं. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात असंच झालं. उस्मान तारीकने या सामन्यात केलेली गोलंदाजी चर्चेत राहिली. या सामन्यात त्याने चार षटकं टाकली आणि 27 धावा देत 3 विकेट काढल्या. त्यामुळे भारताविरूद्धच्या सामन्यात त्याची भीती सतावत आहे. पण असं असलं तरी भारतीय संघ त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवला उस्मान तारीकबाबत प्रश्न विचारला गेला. पाकिस्तानी पत्रकाराने तारीकचा उल्लेख ‘आऊट ऑफ सिलॅबस’ असा केला. त्यावर सूर्यकुमार यादवने रोखठोक उत्तर दिलं.

भारतीय संघ पहिल्यांदाच तारीक उस्मानचा सामना करणार आहे. त्यामुळे त्याचा सामना करणं वाटतं तितकं सोपं नाही. सूर्यकुमार यादवने सांगितलं की, ‘जर परीक्षेत सिलॅबसबाहेरचा प्रश्न आला तर तु्म्ही तो प्रश्न सोडत नाही तर त्याचं उत्तर देण्याचं प्रयत्न करता.’ सूर्यकुमार यादवने या प्रश्नचं उत्तर देताना पुढे स्पष्ट केलं की, ‘आमचा हाच प्रयत्न असेल. तो एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज आहे. पण आम्ही शरणागती पत्कारणारनाही. आम्ही अशा पद्धतीच्या गोलंदाजांविरुद्ध सराव करतो. आम्ही सराव शिबिरात याबाबत अभ्यास केला आहे. आता ते प्रत्यक्ष मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करू.’

गेल्या वर्षभरात भारतीय संघ फिरकीचा सामना करताना अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात पाकिस्तानकडे फिरकीची फौज आहे. त्यामुळे भातीय संघाला काळजीपूर्वक कामगिरी करावी लागणार आहे. कोलंबोची खेळपट्टी संथ आणि फिरकीला पूरक आहे. भारताची जमेची बाजू म्हणजे आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करू शकतो. त्यामुळे दडपण आलं तरी एखाद दुसऱ्या गोलंदाजाला टार्गेट करता येईल. आता तारीकची गोलंदाजी कशी होते आणि भारतीय फलंदाज कसा सामना करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.