IPL 2026 : वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह आमनेसामने! टीम इंडियासाठी महत्त्वाचा सामना

Vaibhav Sooryavanshi vs Jasprit Bumrah: आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात वैभव सूर्यवंशी विरुद्ध जसप्रीत बुमराह हा सामना महत्त्वाचा असणार आहे. आतापर्यंत बुमराहचा सामना करणं भल्याभल्यांना जमलं नाही. वैभव सूर्यवंशी काय करतो? याकडे लक्ष असणार आहे.

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह आमनेसामने! टीम इंडियासाठी महत्त्वाचा सामना
IPL 2026 : वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह आमनेसामने! टीम इंडियासाठी महत्त्वाचा सामना
Image Credit source: PTI/IPL
| Updated on: Apr 07, 2026 | 2:59 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 13व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. हा सामना गुवाहाटीत म्हणजेच राजस्थान रॉयल्सच्या होमग्राउंडवर होणार आहे. यापूर्वी अनेक पर्वात हे दोन संघ भिडले आहेत. पण यावेळचा सामना खास असणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. दोन संघात हा सामना होत असला तरी वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह या द्वंद्वाकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण दोन्ही खेळाडू तोडीसतोड आहेत. वैभव सूर्यवंशीने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून आक्रमक पवित्रा दाखवला आहे. पण यावेळी समोर दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह असणार आहे. जसप्रीत बुमराहचा सामना करणं भल्याभल्यांना जमलं नाही. आता 15 वर्षी वैभव सूर्यवंशी कसा सामना करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

काय म्हणाले कोच मनिष ओझा?

आयपीएल स्पर्धेत वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह यापूर्वी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पण  तेव्हा सामना झाला नव्हता. कारण तेव्हा दीपक चाहरने त्याला दुसऱ्या चेंडूवर तंबूत धाडलं होतं. पण आता वैभव सूर्यवंशी अनुभवासह मैदानात उतरणार आहे. असं असताना वैभव सूर्यवंशीसमोर जसप्रीत बुमराहचं आव्हान असणार आहे की टीम इंडियात येण्याची संधी? या प्रश्नावर वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनिष ओझा यांनी टीव्ही 9 शी बोलताना उत्तर दिलं. मनिष ओझा यांनी सांगितलं की, वैभव आणि बुमराह समोरासमोर असतील तेव्हा चांगला सामना पाहायला मिळेल. बुमराहचा सामना करणं वाटतं तितकं सोपं नाही. तर वैभवला आक्रमक खेळायला आवडतं. अशा स्थितीत वैभवसमोर बुमराहचं आव्हान आणि संधी दोन्ही असेल.

मनिष ओझा यांनी सांगितलं की, वैभव सूर्यवंशीने बुमराहचा सामना प्रभावीपणे केला तर त्याला मोठी संधी मिळू शकते. या माध्यमातून वैभव दबावात चांगलं खेळू शकतो हे दाखवून देईल. तसेच जगभरातील गोलंदाजांचा सामना करण्यास सज्ज असल्याचं दाखवून देईल. वैभव आक्रमक खेळण्यास यशस्वी झाला तर निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेईल. तसेच टीम इंडियात खेळण्याची संधी मिळू शकते. असं असताना मनिष ओझा पुढे म्हणाले की, बुमराहला मोठे फटके मारणं सोपं नाही. वैभव सूर्यवंशीने बुमराहचा सामना कसा करावा? यावर भाष्य करताना मनिष ओझा म्हणाले की, ते पूर्णपणे वैभवच्या स्किल्स आणि मानसिक क्षमतेवर अवलंबून आहे.

Follow Us