
वैभव सूर्यवंशी याने आतापर्यंत बॅटिंगने सर्वांनाच प्रभावित केलंय. भारताच्या या 14 वर्षीय फलंदाजाने आयपीएलच्या 18 व्या मोसमात शतक ठोकत साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. वैभवने आयपीएलमध्ये शतक ठोकून भविष्यातील सर्वात मोठा फलंदाज होणार, याचे संकेत दिले. वैभवने तेव्हापासून त्या दिशने यशस्वीरित्या घोडदौड सुरु ठेवली आहे. वैभवने बॅटिंगने असंख्य असे विक्रम मोडीत काढले. त्यानंतर वैभवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विपक्षीय मालिकेत कर्णधार म्हणूनही धमाका केला आहे. वैभवने भारताला बुधवारी 7 जानेवारीला आपल्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलग तिसऱ्या आणि अंतिम युवा एकदिवसीय सामन्यात विजयी केलं. वैभवने यासह एकाच मालिकेत कर्णधार म्हणून तिसरा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. वैभवने अंडर 19 भारताचा संघाचा माजी कर्णधाराचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
आयुष म्हात्रे याच्या दुखापतीमुळे वैभवला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नेतृत्वाची जबाबदारी मिळाली. वैभवने पहिल्याच सामन्यासाठी मैदानात उतरताच आणि त्यानंतर भारताला विजयी करत इतिहास घडवला. वैभव क्रिकेट विश्वात नेतृत्व करणारा सर्वात युवा कर्णधार ठरला. तसेच वैभव संघाला जिंकवणारा सर्वात युवा कर्णधार ठरला. वैभवने असे 2 वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले.
त्यानंतर भारताने दुसरा आणि तिसरा सामनाही जिंकला. भारताने दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या सामन्यात 233 धावांनी लोळवलं. श्रीलंकेला 394 धावांचा पाठलाग करताना 160 धावांपर्यंतच पोहचता आलं. भारताने यासह दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने क्लिन स्वीप केलं. वैभवने यासह अंडर 19 संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंद याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. वैभव अंडर 19 क्रिकेटमधील द्विपक्षीय मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला क्लिन स्वीप करणारा युवा कर्णधार ठरला आहे. वैभवने याबाबत उन्मुक्त चंद याला पछाडलं.
उनमुक्त चंद याने आजपासून 13 वर्षांआधी कर्णधार म्हणून इतिहास घडवला होता. उन्मुक्त 2012 साली अंडर 19 टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला होता. भारताने उन्मुक्तच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या द्विपक्षीय मालिकेत धमाकेदार कामगिरी करत इतिहास घडवला होता. भारताने ही 5 सामन्यांची मालिका एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केली होती. भारताने कांगारुंचा 5-0 ने धुव्वा उडवला होता. कर्णधार उन्मुक्त तेव्हा 17 वर्षांचा होता. त्यानंतर आता 13 वर्षांनी वैभवने उन्मुक्तला पछाडून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.
दरम्यान वैभव सूर्यवंशी याने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात शतक झळकावलं. वैभवचं हे अंडर 19 कर्णधार म्हणून पहिलंवहिलं शतक ठरलं. वैभवने या सामन्यात 74 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 9 फोरसह 127 रन्स केल्या. वैभवंचं कर्णधार म्हणून हे पहिलं शतक ठरलं.