
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला 96 धावांनी पराभूत करत जेतेपद मिळवलं. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकल्यानंतर टीम इंडियातील खेळाडू आपआपल्या फ्रेंचायझीच्या तंबूत रूजू झाले आहेत. काही खेळाडू अजूनही घरी आराम करत असून सराव शिबिरात भाग घेणार आहेत. काही खेळाडू महिन्याभराच्या तणावातून मुक्त आता कुठे शांतपणे स्वत:साठी वेळ देत आहेत. कुलदीप यादव आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी लग्न करत आहे. तर वरूण चक्रवर्तीने वर्ल्डकप विजयाच्या आनंदात वॉशिंग्टन सुंदरसोबत 14 किलोमीटरची परिक्रमा केली. यावेळी वरूण चक्रवर्ती एका छोट्या दुकानावर बसलेला दिसला. तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई येथे एका छोटाश्या दुकानात वरूण चक्रवर्ती बसला होता. यात मोबाईलवर काही तरी स्क्रोल करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वरूण चक्रवर्तीसारखाच संजू सॅमसनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात संजू सॅमसन एका चहाच्या दुकानात बसलेला दिसत आहे. वर्ल्ड चॅम्पियन संजू सॅमसनला असं चहाच्या दुकानात बसलेलं पाहून स्टाफही आवाक् झाला. कर्मचाऱ्यांनी या संधीचा फायदा उचलून त्याच्यासोबत काही फोटोही काढले. संजू सॅमसनने त्यांना नाराज केलं नाही. संजू सॅमसनने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. सलग तीन सामन्यात अर्धशतकी करून टीम इंडियाला जेतेपद मिळवून दिलं. अंतिम सामन्यातही त्याने जबरदस्त खेळी केली. या कामगिरीसाठी त्याला प्लेयर ऑफ द टूर्नामेंटच्या पुरस्कारने गौरविण्यात आलं.
Varun Chakravarthy was seen sitting at a local shop with Sundar after completing the 14-km Girivalam (parikrama) around Arunachala Hill in Tiruvannamalai.
The moment reflected Varun’s simplicity and humility.❤ pic.twitter.com/ZVVbNv9Wk4
— Sonu (@Cricket_live247) March 12, 2026
Man of simplicity ❤️
Sanju Samson spotted at a local tea shop in Kerala today. The staffs were surprised to see their World Cup Hero stop by and clicked pictures with them 😇 pic.twitter.com/b0VWFEyPe3
— Deepu (@deepu_drops) March 12, 2026
संजू सॅमसन टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने 321 धावा केल्या. तर वरूण चक्रवर्ती गोलंदाजीत महागडा ठरला पण त्याने 14 विकेट काढत टीम इंडियाच्या विजयात हातभार लावला. भारताने जेतेपद मिळवल्यानंतर बीसीसीआयने टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव केला आहे. टीम इंडियाला 131 कोटींची रक्कम दिली आहे. त्यामुळे टीम इंडियातील 15 खेळाडूंना प्रत्येकी 6 कोटी रूपये मिळणार आहेत.