AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोलनंतर आता विमानाच्या इंधनातही इथेनॉल मिसळणार? सरकारकडून मोठी अपडेट, खरं काय ते सांगून टाकलं

आता पेट्रोलनंतर विमानात वापरणाऱ्या ATF मध्येही इथेनॉल मिश्रण करणार आहे असा दावा केला जात आहे. आता यावर सरकराने स्पष्टीकरण देत गोंधळ दूर केला आहे.

पेट्रोलनंतर आता विमानाच्या इंधनातही इथेनॉल मिसळणार? सरकारकडून मोठी अपडेट, खरं काय ते सांगून टाकलं
| Updated on: Aug 06, 2026 | 3:36 PM
Share

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण (ई20) कार्यक्रमामुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्चात दरवर्षी सुमारे 4 अब्ज डॉलर्स (सुमारे 38,000 कोटी रुपये) वाचू शकतात. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने राज्यसभेत ही माहिती देताना सांगितले की, इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रम देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि परकीय चलन बचतीसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. आता पेट्रोलनंतर विमानात वापरणाऱ्या ATF मध्येही इथेनॉल मिश्रण करणार आहे असा दावा केला जात आहे. आता यावर सरकराने स्पष्टीकरण देत गोंधळ दूर केला आहे  सरकारने स्पष्ट केले आहे की एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये इथेनॉल मिसळण्याची त्यांची कोणतीही योजना नाही. हा दावा पूर्णपणे खोटा आणि बेजबाबदारपणाचा आहे, असे सरकारने म्हटले आहे.

सरकारचा असा कोणताही प्रस्ताव नाही. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की, सूत्रांकडून त्यांना असे समजले आहे की सरकार एटीएफमध्ये इथेनॉल मिसळण्याची योजना आखत आहे. त्यांनी सांगितले की, तज्ज्ञांच्या मते याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “इथेनॉल आणि सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (एसएएफ) पूर्णपणे भिन्न आहेत आणि ते एकमेकांमध्ये मिसळले जाऊ नयेत. एसएएफ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित असलेले हवाई इंधन आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेने मान्यता दिली आहे आणि ते जगभरात स्वीकारले गेले आहे. त्याची कठोर चाचणी केली जाते आणि ते कडक जागतिक सुरक्षा मानकांची पूर्तता करते.”

ते पुढे म्हणाले की, हवाई सुरक्षेबद्दल चुकीची माहिती पसरवल्याने हवाई प्रवाशांमध्ये केवळ अनावश्यक चिंता निर्माण होते. प्रवासी सुरक्षा हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात इथेनॉल-मिश्रित पेट्रोल किंवा ई20 बाबत चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर असे दावे केले जात आहेत की, याचा वाहनांच्या इंजिनवर परिणाम होतो आणि इंधन कार्यक्षमतेवर (मायलेजवर) परिणाम होतो.

आज ‘X’ वरील एक लेख शेअर करत केजरीवाल यांनी म्हटले आहे की, देशात एटीएफमध्ये इथेनॉल आणि इतर कृत्रिम हायड्रोकार्बन्स मिसळण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यांनी लिहिले, “तुमच्या विमानाचे इंजिन ऐन उड्डाणात बंद पडू शकते. भेसळयुक्त विमान इंधनावर चालणाऱ्या विमानातून प्रवास करणे तुम्हाला परवडेल का?”

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?