
विदर्भाच्या पोट्ट्यांचं गेल्या स्पर्धेत चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं. तेव्हा विदर्भाला अंतिम सामन्यात कर्नाटक विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे विदर्भाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र पोट्ट्यांनी पराभवामुळे खूचून न जाता जोरदार मुसंडी मारली. विदर्भ क्रिकेट टीमने हर्ष दुबे याच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विदर्भाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 2025-2026 या मोसमातील अंतिम सामन्यात सौराष्ट्रचा धुव्वा उडवला आहे. विदर्भ यासह विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील चॅम्पियन ठरली आहे. विदर्भाची ही ट्रॉफी जिंकण्याची पहिलीच वेळ ठरली आहे.
ओपनर अथर्व तायडे याने केलेल्या शतकाच्या जोरावर विदर्भाने सौराष्ट्रसमोर 318 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र सौराष्ट्रला विजयी धावांचा पाठलाग करताना संपूर्ण 50 षटकंही खेळता आलं नाही. विदर्भाने सौराष्ट्रला 7 बॉल आणि 38 धावांआधी रोखलं. विदर्भाच्या गोलंदाजांनी सौराष्ट्रचं 48.5 ओव्हरमध्ये 279 धावांवर पॅकअप केलं. विदर्भाने अशाप्रकारे विजय हजारे करंडकावर आपलं नाव कोरलं. तर सौराष्ट्रला उपविजेतापदावर समाधान मानावं लागलं.
सौराष्ट्रने महाअंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून विदर्भाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विदर्भ ‘टीमने या संधीचा फायदा घेत 300 पार मजल मारली. विदर्भाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 317 धावा केल्या. अथर्व तायडे याने केलेल्या शतकी खेळीमुळे विदर्भाला 300 पार पोहचता आलं.
अथर्वने विदर्भासाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. अथर्वने 118 चेंडूंमध्ये 128 धावांची खेळी केली. अथर्वने या खेळीत 15 चौकार आणि 3 षटकार लगावले. तसेच विदर्भाचा स्टार अमन मोखाडे याने 33 धावांचं योगदान दिलं. यश राठोड याने 54 धावांच खेळी साकरली. तर रवीकुमार समर्थ याने 25 धावा केल्या. सौराष्ट्रसाठी अंकुर पंवार याने विदर्भाच्या 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. चेतन सकारिया आणि चिराज जानी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
सौराष्ट्रला विजयी धावांचा पाठलाग करताना काही खास सुरुवात करता आली नाही. विश्वराज जडेजा आणि हरविक देसाई झटपट बाद झाले. मात्र प्रेरक मंकड याने 88 धावांची खेळी केल. त्यामुळे सौराष्ट्रच्या विजयाची आशा कायम होती. चिराग जानी याने ही 64 धावा जोडल्या. मात्र विदर्भाच्या गोलंदाजांनी आपली धार कायम ठेवली. कर्णधार हर्ष दुबेल याने विकेट घेत मॅच फिरवली. त्यामुळे सौराष्ट्रचं 48.5 ओव्हरमध्ये 279 धावांवर पॅकअप झालं.
विदर्भाने पटकावला विजय हजारे करंडक
𝐕𝐢𝐝𝐚𝐫𝐛𝐡𝐚 𝐚𝐫𝐞 𝐭𝐡𝐞 𝐰𝐢𝐧𝐧𝐞𝐫𝐬 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐕𝐢𝐣𝐚𝐲 𝐇𝐚𝐳𝐚𝐫𝐞 𝐓𝐫𝐨𝐩𝐡𝐲 👏
Yash Thakur takes the last wicket to win it for Vidarbha 🙌
Scorecard ▶️ https://t.co/9nMrJBarkl#VijayHazareTrophy | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/2ETZABF5DX
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 18, 2026
विदर्भासाठी यश ठाकूर याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर नचिकेत भुते याने 3 विकेट्स घेतल्या. तसेच दर्शन नळकांडे याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.