VHT : सर्फराज-मुशीरचा सख्ख्या भावांचा अर्धशतकी तडाखा, हार्दिकचा झंझावात, मुंबईच्या 331 धावा

Mumbai vs Uttarakhand 1st Innings Highlights : मुंबईसाठी हार्दिक तामोरे याने निर्णायक क्षणी सर्वाधिक धावा केल्या. हार्दिक नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. मात्र त्याच्या खेळीमुळे मुंबईला 331 धावांपर्यंत पोहचता आलं.

VHT : सर्फराज-मुशीरचा सख्ख्या भावांचा अर्धशतकी तडाखा, हार्दिकचा झंझावात, मुंबईच्या 331 धावा
Sarfaraz Khan and Musheer Khan
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 26, 2025 | 4:51 PM

विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात मुंबई क्रिकेट टीमने धमाका केलाय. मुंबईने जयपूरमध्ये उत्तराखंड विरुद्ध 300 पार मजल मारलीय. मुंबईच्या पहिल्या विजयाचा हिरो रोहित शर्मा हा उत्तराखंड विरुद्ध अपयशी ठरला. रोहितला भोपळाही फोडता आला नाही. मात्र सर्फराज खान आणि मुशीर खान या सख्ख्या भावांनी अर्धशतकी खेळी केली. तर हार्दिक तामोरे याने 90 पेक्षा अधिक धावा केल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. मुंबईने अशाप्रकारे उत्तराखंडसमोर 332 धावांचं आव्हान ठेवलंय. मुंबईने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 331 धावा केल्या. आता मुंबई हा सामना जिंकते की उत्तराखंड या धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात यश मिळवणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

मुंबईची ओपनिंग जोडी फ्लॉप

उत्तराखंडने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. रोहित शर्मा आणि अंगकृष रघुवंशी ही सलामी जोडी अपयशी ठरली. रोहितला तर भोपळाही फोडता आला नाही. रोहित त्याच्या खेळीतील पहिल्याच बॉलवर आऊट झाला. तर अंगकृषने 11 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे मुंबईची स्थिती 2 आऊट 22 अशी झाली. त्यानंतर सर्फराज आणि मुशीर या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आणि मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी भागीदारीदरम्यान अर्धशतकं झळकावली. सर्फराज आणि मुशीरने तिसऱ्या विकेटसाठी 90 बॉलमध्ये 107 रन्सची पार्टनरशीप केली. मुशीर आऊट होताच या भागीदारीला ब्रेक लागला. मुशीरने 56 बॉलमध्ये 7 फोरसह 55 रन्स केल्या. मुशीरनंतर काही धावांच्या अंतराने सर्फराज खान हा देखील आऊट झाला. सर्फराजने 49 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारसह 55 रन्स केल्या.

त्यानंतर हार्दिक तामोरे याने इतर सहकाऱ्यांसह किल्ला लढवला. हार्दिकने सिद्धेश लाड याच्यासह 53 धावांची भागीदारी केली. सिद्धेश 21 धावांवर बाद झाला. हार्दिक आणि कॅप्टन यांनी सहाव्या विकेटसाठी 44 रन्स जोडल्या. शार्दूल 29 रन्स केल्या.

हार्दिक-शम्सची निर्णायक भागीदारी

शार्दूल आऊट झाल्याने मुंबईचा स्कोअर 38 ओव्हरमध्ये 6 आऊट 230 असा झाला. तिथून हार्दिक आणि शम्स या दोघांनी कमाल केली. या जोडीने सातव्या विकेटसाठी अवघ्या 65 चेंडूत 95 धावांची भागीदारी केली. शम्सचं अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. शम्सने 35 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्ससह 48 रन्स केल्या. मुंबई अशाप्रकारे 325 धावांपर्यंत पोहचली. तर तनुष कोटीयन आणि हार्दिक ही जोडी नाबाद परतली. तनुषने 4 रन्स केल्या. तर हार्दिकने मुंबईकडून सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. हार्दिकने 82 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 7 फोरसह एकूण 92 रन्स केल्या. उत्तराखंडसाठी देंवेंद्र सिंह बोरा याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर इतर तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.