VIDEO : मित्राला भेटायला गेला अन् रेस्टॉरंटमध्ये अडकला, वाहतूक कोंडी, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma : 15 ऑगस्टलाही असाच प्रकार घडला होता. रोहित त्याच्या मित्राला भेटण्यासाठी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. हे लक्षात येताच रोहितचे हजारो चाहते रेस्टॉरंटबाहेर जमा झाले. अधिक वाचा...

VIDEO : मित्राला भेटायला गेला अन् रेस्टॉरंटमध्ये अडकला, वाहतूक कोंडी, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल
रोहित शर्मा मित्राला भेटायला गेला अन् रेस्टॉरंटमध्ये अडकला
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 7:26 AM

नवी दिल्ली : मित्राला भेटायला गेला आणि अडकला, अशी अवस्था रोहित शर्मा याची (Rohit Sharma) झाली. अर्थातच रोहित हा दिग्गज क्रिकेटपटू आहे. त्यामुळे चाहत्यांची सारखी गर्दी त्याच्या जवळ असणारच. याही वेळी हाच प्रकार होता. पण, थोडं वेगळं काही घडलं. जे वाचून तुम्हीही थक्क व्हाल. टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा हा देशातील सर्वाधिक पसंतीचा क्रिकेटपटू आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. 15 ऑगस्टलाही असाच प्रकार घडला होता. खरंतर रोहित त्याच्या मित्राला भेटण्यासाठी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. हे लक्षात येताच रोहितचे हजारो चाहते रेस्टॉरंटबाहेर जमा झाले. प्रत्येकजण आपल्या स्टार क्रिकेटरची एक झलक पाहण्यासाठी आतुर दिसत होता. दरम्यान, रोहितचा एक व्हिडीओ व्हायर होतोय, तो व्हिडीओ नेमका कशाचा आहे, हे जाणून घ्या…

चाहत्यांच्या गर्दीनं रोहित अस्वस्थ

रोहित रेस्टॉरंटमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. पण, प्रचंड गर्दी पाहून त्याला आपला विचार बदलावा लागला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला परत आत पाठवले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांची एवढी गर्दी पाहून रोहितही अस्वस्थ झाला.

रोहितचा व्हिडीओ व्हायरल

वाहतूक कोंडी

अलीकडेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजचा पाच T20 सामन्यांच्या मालिकेत पराभव केला. त्यानंतर संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना ब्रेक देण्यात आला आहे. आशिया चषकापूर्वी रोहितही ब्रेकवर आहे. मात्र, हा ब्रेक त्याच्यासाठी त्रासदायक ठरला. मुंबईतील ‘द टेबल’ रेस्टॉरंटमध्ये तो आपल्या मित्राला भेटायला गेला होता. काही वेळातच या रेस्टॉरंटबाहेर त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

टीम इंडियाची फिटनेस चाचणी

रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेला पोहोचला आहे. 18 ऑगस्टपासून दोन्ही देशांदरम्यान 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. आशिया चषकासाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे फिटनेस शिबिर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होणार आहे. येथे खेळाडूंना फिटनेस चाचणी द्यावी लागेल. यानंतर टीम इंडिया दुबईला रवाना होणार आहे. जिथे टीम इंडियाचे कॅम्प 2-3 दिवस चालणार आहे. आशिया चषकात भारताला 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.

Non Stop LIVE Update
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.