AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinod Kambli च्या मदतीसाठी महाराष्ट्रातील उद्योजक पुढे आला, लाख रुपयाच्या नोकरीची ऑफर

विनोद कांबळी आता 50 वर्षांचा आहे. 2019 मध्ये त्याने टी 20 मुंबई लीग स्पर्धेत शेवटचा कोचिंगचा जॉब केला होता. त्यानंतर कोरोनामुळे सगळच कोलमडलं. विनोद कांबळीची ही अडचण लक्षात घेऊन, आता महाराष्ट्रातील एक उद्योगपती (Businessman) पुढे आले आहेत.

Vinod Kambli च्या मदतीसाठी महाराष्ट्रातील उद्योजक पुढे आला, लाख रुपयाच्या नोकरीची ऑफर
Vinod kambli Image Credit source: instagram
| Edited By: | Updated on: Aug 18, 2022 | 6:47 PM
Share

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची (Vinod Kambli) आर्थिक स्थिती (Financial condition) सध्या चांगली नाहीय. त्याने अलीकडेच एका मुलाखतीत सध्या त्याच्याकडे काम नसल्याचं म्हटलं होतं. कुटुंबाचा डोलारा चालवण सोपं नाहीय. सध्या आपल्याला फक्त दर महिन्याला BCCI कडून मिळणाऱ्या पेन्शनचा आधार असल्याच सांगितलं होतं. विनोद कांबळी आता 50 वर्षांचा आहे. 2019 मध्ये त्याने टी 20 मुंबई लीग स्पर्धेत शेवटचा कोचिंगचा जॉब केला होता. त्यानंतर कोरोनामुळे सगळच कोलमडलं. विनोद कांबळीची ही अडचण लक्षात घेऊन, आता महाराष्ट्रातील एक उद्योगपती (Businessman) पुढे आले आहेत. संदीप थोरात असं त्यांच नाव आहे. उद्योजक संदीप थोरात यांनी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला नोकरीची ऑफर दिली आहे. मुंबईतल्या सह्याद्री उद्योगसमूहाच्या फायनान्स कंपनीत एक लाख रुपये पगाराची ऑफर त्यांनी दिली आहे.

संदीप थोरात काय म्हणाले?

“महाराष्ट्रात खूप चांगले व्यक्ती आहेत, मात्र त्यांच्यावर ही वेळ का येते? हेच कळलं नाही, असं संदीप थोरात म्हणाले. विनोद कांबळी यांनी क्रिकेट मध्ये भारताचे नाव एका विशिष्ट उंचीवर नेऊन पोहोचवलं. मात्र आज कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी ओढाताण करावे लागत असेल हे आपलं अपयश आहे” असं ते म्हणाले.

आधी कुठे नोकरी करायचा कांबळी?

विनोद कांबळी नेरुळ येथील तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादामी मध्ये युवा क्रिकेटपटुंना मार्गदर्शन करायचा. पण नेरुळ पर्यंतचा प्रवास खूप लांब पडायचा म्हणून त्याने ते बंद केलं. “मी सकाळी 5 वाजता उठायचो. टॅक्सी पकडून डी.वाय.पाटील स्टेडियम मध्ये जायचो. खूप दगदग व्हायची. त्यानंतर मी संध्याकाळी बीकेसी ग्राऊंड मध्ये कोचिंग सुरु केली” असं कांबळीने मिड डे ला सांगितलं. “मी निवृत्त क्रिकेटपटू आहे. पूर्णपणे बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनवर अवलंबून आहे. बोर्डाक़डून मिळणारे पैसे हेच एकमेव माझ्या उत्त्पन्नाच साधन आहे. त्यासाठी मी खरोखर त्यांचा आभारी आहे. त्यामुळे मला कुटुंब चालवता येतय” असं कांबळी म्हणाला.

सचिन संदर्भातही कांबळी बोलला

बालपणीचा मित्र आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला तुझी आर्थिक स्थिती माहित आहे का? या प्रश्नावर कांबळी म्हणाला की, “सचिनला सगळं काही माहित आहे. पण मला त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही. त्याने मला तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादामी काम दिलं होतं. त्याचा मला आनंद आहे. तो चांगला मित्र आहे. माझ्या पाठिशी तो नेहमीच उभा आहे”

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.