विराट कोहली आणि रवींद्र जडेजाचा बुमराहसमोरच अ‍ॅक्शन रिप्ले, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीत पहिला दिवशी दिवशी पावसामुळे खंड पडला. 35 षटकांचा खेळ झाला तेव्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. यावेळी बांगलादेशने 3 गडी गमवून 107 धावा केल्या होत्या. असं असताना या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विराट कोहली आणि रवींद्र जडेजाचा बुमराहसमोरच अ‍ॅक्शन रिप्ले, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल
Image Credit source: video grab
| Updated on: Sep 27, 2024 | 4:25 PM

कानपूरमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे भारत बांगलादेश कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी खंड पडला आहे. 35 षटकांचा खेळ संपला तेव्हा खराब प्रकाशमानामुळे पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. बांगलादेशने 3 गडी गमवून 107 धावा केल्या आहेत. वेगवान गोलंदाज आकाश दीपने 2 आणि आर अश्विनने 1 गडी बाद केल आहे. सामन्याचं असं सर्व चित्र असताना विराट कोहली आणि रवींद्र जडेजा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हसू रोखू शकणार नाहीत. जसप्रीत बुमराहसमोरच या दोघांनी त्याच्या गोलंदाजीची नक्कल केली. बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करताना यशस्वी जयस्वाल आणि असिस्टेंट कोच टेन डेस्काटेही पाहात होते.

विराट कोहली या व्हिडीओत बुमराहच्या गोलंदाजी सुरुवात कशी होते हे दाखवत आहे. यासाठी तो खास अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. त्यानंतर रवींद्र जडेजानेही तसंच काहीसं केलं. त्यामुळे उपस्थित खेळाडूंना हसू आवरता आलं नाही. विराट कोहली आणि रवींद्र जडेजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर चेन्नई कसोटीतही फेल गेला आहे. टी20 वर्ल्डकपमध्येही अंतिम फेरीत त्याची बॅट चालली होती. त्यामुळे त्यासाठी कानपूर कसोट खूपच महत्त्वाची आहे. कारण चेन्नईतील दोन्ही डावात काही खास करता आलं नाही. या वर्षात 17 डावात त्याला फक्त एक अर्धशतक ठोकण्यात यश आलं आहे. ते देखील टी20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत आलं होतं. टीम इंडियाला आता न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी खेळायची आहे. त्यामुळे विराट कोहलीचं फॉर्मात येणं गरजेचं आहे.

दुसरीकडे, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी केली होती. त्याने पहिल्या डावात 50 धावा देत 4 गडी बाद केले होते. तर दुसऱ्या डावात एक गडी बाद करण्यात यश मिळालं होतं. दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचे तीन विकेट गेले आहेत. यात दोन विकेट आकाश दीपने, तर एक विकेट आर अश्विनने घेतली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us