
मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये भारत सुरूवातीलाच बॅकफूटवर ढकलला गेला आहे. भारताचे तीन खेळाडू पॉवरप्लेच्या आतमध्ये माघारी परतले, यामध्ये स्टार खेळाडू विराट कोहली याचाही समावेश आहे. कोहलीकडून सर्वांनाच अपेक्षा होत्या मात्र त्याला साधा भोपळाही फोडता आला नाही. विराट कोहली स्वत: सुद्धा नाराजा झालेला दिसला, झिरोवर आऊट झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये काय केलं याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Virat Kohli dismissed for a 9 ball duck.🙂 pic.twitter.com/yRL5uS2sFs
— Ahsan Shah (@ahsan_vibes01) October 29, 2023
भारताने टॉस गमावल्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी यावं लागलं होतं. इंग्लंडचा हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. आक्रमक गोलंदाजी करत भारतीय संघाला मोठे झटके दिले. यामध्ये विराट शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. शुबमन याने चौकार मारत डावाची सुरूवात केलेली मात्र त्याला ख्रिस वोक्स बोल्ड करत माघारी पाठवलं. त्यापाठोपाठ आलेल्या विराट कोहलीनेही आठ बॉमध्ये एकही धाव घेतली नाही शेवटी तो मोठा फटका मारण्याच्या नादात तो आऊट झाला.
दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा शून्यावर विराट कोहली बाद झाला. सलग आठ बॉल डॉट गेल्याने त्याच्यावर प्रेशर आला असावा आणि मोठा फरका मारण्याच्या नाादात कॅचआऊट झाला. ड्रसिंग रूममध्ये गेल्यावर विराट संतापलेला दिसला.
Virat Kohli is furious with himself
After his dismissal pic.twitter.com/DXWzrXofOp— cric_mawa (@cric_mawa_twts) October 29, 2023
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड