Virat Kohli : विराट आऊट झाल्याने भडकला, आधी बोट दाखवलं मग..

Virat Kohli Angry : आता पुन्हा एकदा विराट कोहलीच्या तापट स्वभावाचं दर्शन क्रिकेट चाहत्यांना झालंय.

Virat Kohli : विराट आऊट झाल्याने भडकला, आधी बोट दाखवलं मग..
विराट कोहलीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 7:24 PM

ढाका : विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या तापट आणि आक्रमक स्वाभावासाठी आोळखला जातो. विराटने आतापर्यंत मैदानात अनेकदा विरोधी संघावर भडकला आहे. मात्र मध्यंतरी विराट शांत झाला होता. पण आता पुन्हा एकदा विराटच्या तापट स्वभावाचं दर्शन क्रिकेट चाहत्यांना झालंय. विराट बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी (BAN vs IND, 2nd Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी संतापला. विराटचा संतापल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय. (virat kohli angry on bangladesh video viral on social media ban vs ind 2nd test)

नक्की काय झालं?

विराट दुसऱ्या कसोटीत पुन्हा फ्लॉप ठरला. विराटला दुसऱ्या डावात 22 चेंडू खेळून अवघी 1 धाव करता आली. स्पीनर मेहदी हसनने विराटला 20 व्या ओव्हरच्या 5 व्या बॉलवर मोमिनुल हकच्या हाती कॅच आऊट केलं. आऊट झाल्यानंतर विराट संतापला.

हे सुद्धा वाचा

पव्हेलियनच्या दिशेने परतताना विराटने स्वत:वरचा ताबा गमावला. विराटला माघारी परतताना बांगलादेशच्या खेळाडूंनी डिवचल्यासारखं वाटलं. मग काय विराट संतापला. विराटने आधी बोट दाखवून खुणावलं. ज्याने विराटने डिवचलं त्याच्याकडे विराटने इशारा केला. यादरम्यान बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि फिल्ड अंपायर्सने विराटला समजवण्याचा प्रयत्न केला. यानंतर विराट बडबडत मैदानाबाहेर निघाला.

विराट कोहली भडकला

टीम इंडियाला विजयासाठी 100 धावांची आवश्यकता

दरम्यान टीम इंडियाने तिसऱ्या दिवसखेर 23 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 45 धावा केल्या आहेत. कर्णधार केएल राहुल 2, चेतेश्वर पुजारा 6, शुबमन गिल 7 आणि विराट 1 रन करुन आऊट झाले. तर अक्षर पटेल 26 आणि जयदेव उनाडकट 3 धावा करुन नाबाद आहेत.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल, जयदेव उनादकट, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

बांग्लादेश प्लेइंग इलेव्हन : शाकिब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसेन, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिट्टन दास, नुरूल हसन, मेहदी हसन, ताइजुल इस्लाम, खालेद अहमद आणि तस्कीन अहमद.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.