आरसीबीच्या ड्रेसिंग रुममधून विराट कोहलीच्या बॅटची चोरी! खेळाडूंना घातल्या शिव्या आणि… Video

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. ग्रीन जर्सी परिधान केल्यानंतर पराभव होतो, असं मिथक आरसीबीने मोडून काढलं. पण विराट कोहलीचा बॅट जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियम ड्रेसिंग रुममधून गायब झाली. या घटनेचा व्हिडीओ आरसीबीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आरसीबीच्या ड्रेसिंग रुममधून विराट कोहलीच्या बॅटची चोरी! खेळाडूंना घातल्या शिव्या आणि... Video
विराट कोहली
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 14, 2025 | 3:44 PM

आयपीएलच्या 28व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 9 विकेट्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 4 गडी गमवून 173 धावा केल्या आणि विजयासाठी 174 धावा केल्या. या धावा आरसीबीने 17.3 षटकात आरसीबीने फक्त एक गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात फिलीप सॉल्टने 65 धावा करून बाद झाला. तर विराट कोहलीने नाबाद 62 आणि देवदत्त पडिक्कलने नाबाद 40 धावा करून सामना जिंकून दिला. या सामन्यात विराट कोहलीची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्याची खेळी मॅच विनिंग ठरली. पण विराट कोहलीसोबत ड्रेसिंग रुममध्ये धक्कादायक प्रकार घडला. सामन्यानंतर किट पॅक करताना त्याला आपल्या किटमधून एक बॅट गायब झाल्याचं कळलं. या घटनेचा व्हिडीओ आरसीबीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

विराट कोहली 7 बॅटसह जयपूरला आला होता. पण सामना संपल्यानंतर किट पॅक करताना जवळ फक्त 6 बॅट होत्या. त्यामुळे एक बॅट गेली कुठे? यावरून गोंधळ झाला. पण त्याची बॅट काही चोरी झाली नव्हती. खरं तर टिम डेविडने विराटच कोहलीसोबत प्रँक केला होता. टिम डेविडने विराट कोहलीची बॅट आपल्या किटबॅगमध्ये लपवली होती. आरसीबीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात विराट कोहली किट पॅक करताना वैतागलेला दिसला. व्हिडीओत तो वारंवार बॅट कुठे याबाबत विचारणा करत होता. सातवी बॅट दिसत नाही असं सांगत होता. पण एका सहकाऱ्याच्या मदतीने विराट कोहलीला कळलं की, टिम डेविडच्या बॅगेत बॅट आहे. कोहलीने मजेशीर अंदाजात सहकाऱ्यांना शिव्या देत सांगितलं की, तुम्हाला सर्वांना माहिती होतं आणि टिम डेविडच्या बॅगेतून बॅट परत घेतो.

या प्रँकनंतर टिम डेविड म्हणाला की, ‘विराट खूप चांगली फलंदाजी करत होता. तर आम्ही विचार केला की, विराट कोहलीला किती वेळ लागतो की एक बॅट गायब आहे, ते बघू. त्याला काहीच कळलं नाही. कारण तो खेळामुळे खूप खूश होता. त्यामुळे मी त्याला बॅट परत केली.’ दरम्यान, विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये अर्धशतकांचं शतक केलं. जगातील दुसरा आणि भारतातील पहिला खेळाडू आहे. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहे.