AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maxwell Wedding party: मॅक्सवेलच्या लग्नाच्या पार्टीत समंथाच्या ‘ओ अन्तवा’ गाण्यावर विराट कोहलीचे ठुमके, पहा VIDEO

Maxwell Wedding party: ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विन्नी रमनसह मागच्या महिन्यात 27 मार्चला तामिळ पद्धतीने लग्न केलं.

Maxwell Wedding party: मॅक्सवेलच्या लग्नाच्या पार्टीत समंथाच्या 'ओ अन्तवा' गाण्यावर विराट कोहलीचे ठुमके, पहा VIDEO
Glen maxwell Wedding partyImage Credit source: instagram
| Updated on: Apr 28, 2022 | 4:50 PM
Share

मुंबई: IPL 2022 चा सीजन मध्यावर आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) आपल्या टीमचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलसाठी लग्नाची पार्टी (Glen maxwell Wedding party) आयोजित केली होती. या पार्टीमध्ये टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीसह अन्य खेळाडूंनी भरपूर मजा-मस्ती केली. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह (Anushka Sharma) ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला हजर होता. विराट-अनुष्काच्या लुकचीही भरपूर चर्चा होत आहे. विराटने काळ्या रंगाचा कुर्ता आणि सफेद पायजमा परिधान केला होता. पार्टीतील काही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्टीत गाजलेल्या ‘पुष्पा’ सिनेमातील ‘ओ अन्तवा’ गाणं वाजवण्यात आलं. या गाण्यावर विराटसह आरसीबीच्या खेळाडूंनी ठेका धरला.

2017 पासून विनी रमनला डेट करत होता

ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विन्नी रमनसह मागच्या महिन्यात 27 मार्चला तामिळ पद्धतीने लग्न केलं. 27 एप्रिलला त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला. त्यासाठी आरसीबी फ्रेंचायजीने ग्लेन मॅक्सवेलला ही पार्टी दिली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळणारा मॅक्सवेल 2017 पासून विनी रमनला डेट करत होता. दोघांनी काही दिवसांपूर्वीच लग्न केलं होतं. पण यावेळी तामिळ रितीरिवाजाने लग्न केलं.

डू प्लेसिसच्या पत्नीने नेसली साडी

कोहली पत्नी अनुष्का शर्मासह पार्टीला पोहोचला होता. अनुष्काने दोन फोटो सुद्धा पोस्ट केले आहेत. बायो-बबलमध्ये लग्न सोहळा असं कॅप्शन अनुष्काने या फोटोला दिलं आहे. या पार्टीला आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसिस कुटुंबासह पोहोचला होता. डू प्लेसिस आणि त्याच्या पत्नीने भारतीय पद्धतीचा पेहराव केला होता. डू प्लेसिसने सदरा-लेंगा तर त्याच्या पत्नीने साडी नेसली होती. डू प्लेसिसची पत्नी इमारी विसेर, दोन मुली एमिली आणि जोई सुद्धा लग्नाला आल्या होत्या. मॅक्सवेलला आरसीबीने रिटेन केलं होतं. आरसीबीचा संघ आतापर्यंत नऊ सामने खेळला आहे. ज्यात पाच मध्ये विजय मिळवला, तर चार सामन्यात त्यांचा पराभव झाला.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.