AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना गायीचं, ना म्हशीचं! विराट कोहलीच्या आहारात या दुधाचा वापर, कारण की…

विराट कोहली हे भारतीय क्रिकेट विश्वातील मोठं नाव आहे. त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. त्यामुळे त्याच्यासारखी लाईफस्टाईल फॉलो करण्याचा अनेकांचा प्रयत्न करतो. त्याचं फिटनेस पाहून प्रत्येक जण तसाच डाएट प्लान करण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहिती आहे का विराट त्याच्या डाएटमध्ये खास दुधाचा वापर करतो.

ना गायीचं, ना म्हशीचं! विराट कोहलीच्या आहारात या दुधाचा वापर, कारण की...
विराट कोहलीच्या डाएट प्लानमध्ये या खास दुधाचा वापरImage Credit source: PTI
| Updated on: May 17, 2025 | 6:30 PM
Share

विराट कोहलीची क्रिकेटमधील सर्वात फिट क्रिकेटपटू म्हणून ख्याती आहे. त्याच्या फिटनेसमुळे धावा घेताना विराट कोहली सहज दिसतो. यावरून त्याच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. विराट कोहली हा खाण्यापिण्याच्या बाबतीत नियमांचं पालन करतो. त्याच्याप्रमाणे त्याचे चाहतेही वागण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? विराट कोहली गाय किंवा म्हशीचं दूध पित नाही. त्याच्या आहारात या दुधाचा समावेश नाही. मग विराट कोहलीच्या डाएट प्लान कसा पूर्ण होतो असा प्रश्न तु्म्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल. विराट कोहलीने 2018 मध्ये मांसाहार सोडला. तसेच शाकाहारी जेवण करतो. त्याने 2018 दक्षिण अफ्रिका दौऱ्यात हा निर्णय घेतला होता. तेव्हा कोहलीला आरोग्याची एक समस्या उद्भवली होती. त्यानंतर विराट कोहलीने मांसाहार सोडला आणि पूर्णपणे शाकाहारी जीवनशैली आत्मसात केली. त्याने यावेळी डेअरी उत्पादनं कमी केली.

विराट कोहलीने एका मुलाखतीत सांगितलं की, त्याचा 90 टक्के डाएट हा उकडलेलं किंवा वाफवलेलं अन्न असतं. दुग्धजन्य पदार्थांचं सेवन कमी केलं आहे. कारण अनेकांना दुग्धजन्य पदार्थातील लॅक्टोज पचवणं कठीण होतं. त्यामुळे पोटफुगी आणि अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे विराट कोहलीने गाय आणि म्हशीच्या दुधाऐवजी प्लांट बेस्ड दुधाचा आहारात समावेश केला. मिडिया रिपोर्टनुसार, विराट कोहली बदामाचे दूध पितो. यात लॅक्टोज नाही वरून त्यात भरपूर पोषक तत्व आहेत. यात व्हिटॅमिन ई असल्याने फायदा होतो. कॅलरीज कमी असतात. सौम्य चवीमुळे स्मूदी किंवा कॉफीत वापरले जाऊ शकते. या दुधामुळे तंदुरूस्ती आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत करते.

आयपीएल 2025 स्पर्धेत विराट कोहली फॉर्मात

आयपीएल स्पर्धेत विराट कोहली खेळत असलेला आरसीबी संघाचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित आहे. तीन पैकी एका सामन्यात सामन्यात विजय मिळवला तर थेट अंतिम फेरी गाठणार आहे. दुसरीकडे, विराट कोहलीही फॉर्मात आहे. विराटने 11 सामन्यात 63.13 सरासरीने 505 धावा केल्या आहेत. यात 7 अर्धशतकांचा समावेश आहे. यावेळी 143.46 स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...