AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराटच्या निवृत्तीची अचंबित करणारी माहिती, ‘या’ खास व्यक्तीशी संपर्क साधला अन्…; पडद्यामागे नेमकं काय घडलं?

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयानंतर अनेकांना धक्का बसला आहे. या निर्णयानंतर त्याचे चाहतेही चांगलेच नाराज झाले आहेत.

विराटच्या निवृत्तीची अचंबित करणारी माहिती, 'या' खास व्यक्तीशी संपर्क साधला अन्...; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
virat kohli retiremrnt
| Updated on: May 13, 2025 | 5:22 PM
Share

Virat Kohli Retirement : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयानंतर अनेकांना धक्का बसला आहे. या निर्णयानंतर त्याचे चाहतेही चांगलेच नाराज झाले आहेत. दरम्यान, त्याने हा निर्णय नेमका का घेतला? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. असे असतानाच आता एक नवी माहिती समोर येत आहे. निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी विराच कोहलीने एका खास व्यक्तीकडून सल्ला घेतला होता.

रवी शास्त्री यांच्याशी केली चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार विराटने निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक तथा प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

बऱ्याच दिवसांपासून विराट कोहली…

क्रिकबझ या क्रिकेटविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिल आहे. या वृत्तानुसार विराट कोहली गेल्या बऱ्याच दिवसांपासून कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार करत होता. त्याच्या या विचाराबाबत विराटने रवी शास्त्री यांच्याशी सल्लामसलत केली होती. विराट कोहली रवी शास्त्रींना मेंटॉरच्या रुपात पाहतो. रवी शास्त्री भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असताना विराटक कोहली भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होता. या काळात दोघांचं नातं फारच चांगलं होतं.

…बैठक होऊ शकली नाही, अन्यथा

निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी विराट कोहलीने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली नाही, असे म्हटे जात आहे. इंग्लंडसोबतची कसोटी सामन्यांची मालिका संपेपर्यंत विराट कोहली आपला निर्णय लांबवू शकला असता. विराट कोहली बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला तसेच बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांची भेट घ्यायची होती. मात्र भारत-पाकिस्ता यांच्यातील तणावामुळे ही बैठक होऊ शकली नाही. ही भेट झाली असती तर विराटने कदाचित आपल्या निवृत्तीचा निर्णय लांबवला असता.

दरम्यान, विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी तो भारतीय संघाकडून क्रिकेट खेळताना दिसणार आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा भाग असणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना तो मैदानात क्रिकेट खेळताना पाहायला मिळणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...