Virat Kohli : नो बॉलवरुन अंपायरसह राडा, विराटला मोठा फटका, बीसीसीआयचा दणका

IPL 2024 Virat Kohli No ball Controversy : विराट कोहली याने फिल्ड अंपायरसह बाद दिल्याने नाराजी व्यक्त करत वाद घातला होता. विराटला हाच राग आता महागात पडला आहे.

Virat Kohli : नो बॉलवरुन अंपायरसह राडा, विराटला मोठा फटका, बीसीसीआयचा दणका
Virat kohli controversy ipl 2024,
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Apr 22, 2024 | 6:57 PM

आयपीएलच्या 17 व्या हंगाम सुरु असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली याला सामन्यादरम्यान पंचांशी वाद घालणं चांगलंच महागात पडलं आहे. विराटवर बीसीसीआयने मोठी कारवाई केली आहे. बीसीसीआयने विराटवर अंपायरसह हुज्जत घातल्याने दंड ठोठावला आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात इडन गार्डनमध्ये सामना पार पडला. विराटने या सामन्यात अंपायरसह बाद दिल्याननंतर नाराजी व्यक्त करत हुज्जत घातली होती. विराटला या कृतीसाठी बीसीसीआयने त्याच्यावर सामन्याच्या एकूण मानधनाच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावला आहे.

आरसीबी प्लेईंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि मोहम्मद सिराज.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.