IND vs NZ : चाहत्यांच्या गराड्यात अडकला विराट कोहली, गर्दीमुळे अस्वस्थ चेहरा आणि… Video

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा सज्ज झाले आहेत. या सामन्यासाटी विराट कोहली 7 जानेवारी रोजी वडोदराला पोहोचला. यावेळी त्याला चाहत्यांनी गराडा घातला होता.

IND vs NZ : चाहत्यांच्या गराड्यात अडकला विराट कोहली, गर्दीमुळे अस्वस्थ चेहरा आणि...  Video
IND vs NZ : चाहत्यांच्या गराड्यात अडकला विराट कोहली, गर्दीमुळे अस्वस्थ चेहरा आणि... Video
Image Credit source: video grab
| Updated on: Jan 07, 2026 | 7:34 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात संघाची घोषणा केली असून या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीही आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. यासाठी विराट कोहली 7 जानेवारीला वडोदरा येथे पोहोचला. यावेळी त्याला पाहताच चाहत्यांनी गराडा घातला. विराट कोहली काळ्या रंगाचा टीशर्ट आणि सनग्लासेस घालून विमानतळावर पोहोचला होता. त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठ चाहत्यांची गर्दी जमा झाली. यावेळी उपस्थितांनी कोहली कोहलीच्या घोषणाही दिल्या. गर्दी रेटा इतका होता की त्याला पुढे जाण्यासाठी खूपच धडपड करावी लागली. विराट कोहली कसाबसा धक्का मारत गाडीपर्यंत पोहोचला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुरक्षा रक्षकांनी गर्दी जोर कसाबसा पांगवला आणि विराट कोहलीला गाडीपर्यंत पोहोचवलं. विराट कोहली गाडीत बसला आणि निघून गेला. कोहली त्याची गाडी घेऊन हॉटेलकडे निघाला. कोहलीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या दोन सामन्यात त्याला खातं खोलता आलं नव्हतं. पण तिसर्‍या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर त्याचा फॉर्म सुरुच आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दोन शतकं आणि अर्धशतक ठोकलं होतं. इतकंच काय तर विजय हजारे ट्रॉफीत एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलं. आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तशीच अपेक्षा आहे.

टी20 आणि कसोटी संघातून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीने वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या दृष्टीने विराट कोहली आणि रोहित शर्मा तयारी करत असल्याचं दिसत आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी आता फक्त दीड वर्षांचा अवधी शिल्लक आहे. या दरम्यान दोन्ही खेळाडूंना आपला फॉर्म कायम ठेवायचा आहे.

न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडिया: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली , केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिध्द कृष्णा, प्रदीप कृष्णा, केएल राहुल (विकेटकीपर),अर्शदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी आणि यशस्वी जयस्वाल.