IND vs PAK: जुना Virat Kohli कधी दिसणार? आज मिळालं उत्तर, पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलचं धुतलं, पहा VIDEO

IND vs PAK: तो कधी खेळणार? तो कधी फॉर्म मध्ये येणार? जुना कोहली पुन्हा दिसेल? अशी मागच्या दोन-तीन वर्षापासून चर्चा सुरु आहे. अखेर आज त्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली.

IND vs PAK: जुना Virat Kohli कधी दिसणार? आज मिळालं उत्तर, पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलचं धुतलं, पहा VIDEO
विराट कोहली
Image Credit source: PTI
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 04, 2022 | 9:52 PM

मुंबई: तो कधी खेळणार? तो कधी फॉर्म मध्ये येणार? जुना कोहली पुन्हा दिसेल? अशी मागच्या दोन-तीन वर्षापासून चर्चा सुरु आहे. अखेर आज त्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली. विराट कोहलीने आज पाकिस्तानला त्याच जुनं रुप दाखवलं. पाकिस्तान विरोधात नेहमीच विराटने दमदार खेळ दाखवला आहे. आकडे त्याचा पुरावा आहेत. विराटने आजही तशीच बॅटिंग केली. प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

कोहलीमुळे भारत चांगल्या स्थितीत

आशिया कप मध्ये सुपर 4 राऊंडचे सामने सुरु आहेत. विराट कोहलीने आज पाकिस्तान विरुद्ध शानदार अर्धशतक झळकावलं. कोहलीच या स्पर्धेतील हे सलग दुसरं अर्धशतक आहे. त्याच्या खेळीमुळे भारताला आज पाकिस्तानसमोर चांगलं लक्ष्य उभारता आलं. हाँगकाँग विरुद्ध नाबाद 59 धावा करणाऱ्या कोहलीने आज पाकिस्तान विरुद्ध 60 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 181 धावांपर्यंत पोहोचता आलं.

आज तो जुना कोहली दिसला

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराटने ऋषभ पंत आणि दीपक हुड्डा सोबत महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या केल्या. संघाची धावगती मंदावणार नाही, याची काळजी घेतली. विराटच्या फलंदाजीत आज तो जुना कोहली दिसला. अनेक दिवसांपासून कोहलीच्या लाखो चाहत्यांना त्याच्याकडून अशाच फलंदाजीची अपेक्षा होती. ती त्याने आज पूर्ण केली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें