Virat Kohli Press : पाकिस्तानविरुद्धची मॅच जिंकण्यावर आमचं लक्ष, टीम इंडिया विजयासाठी सज्ज

| Updated on: Oct 23, 2021 | 3:02 PM

आम्ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी तयार आहोत. टीममधील सर्व खेळाडूंना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे आम्ही पाकिस्तानच्या विरुद्ध सामन्यामध्ये चांगला खेळ करु, असं विराट कोहली म्हणाला.

Virat Kohli Press : पाकिस्तानविरुद्धची मॅच जिंकण्यावर आमचं लक्ष, टीम इंडिया विजयासाठी सज्ज
विराट कोहली
Follow us on

दुबई : आम्ही गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या निमित्तानं टी-ट्वेन्टी क्रिकेट खेळत असल्यानं आम्ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी तयार आहोत. टीममधील सर्व खेळाडूंना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे आम्ही पाकिस्तानच्या विरुद्ध सामन्यामध्ये चांगला खेळ करु, असं विराट कोहली म्हणाला. कर्णधारपदाबद्दल यापूर्वी अनेकदा बोललो आहे, आता त्यावर बोलणार नाही, असं विराट कोहली म्हणाला. पाकिस्तानच्या किंवा जगातील कोणत्याही टीम विरोधात खेळताना पूर्ण क्षमतेनं आणि विश्वासानं सामोरं जातो. आम्ही पाकिस्तानच्या मॅचसाठी पूर्ण तयारी केली असून मॅच जिंकण्यावर आमचं लक्ष असेल, असं विराट कोहली म्हणाले.

हार्दिक पांड्याची फिट

हार्दिक पांड्यांची प्रकृती सध्या चांगली असून तो मॅचमध्ये दोन ओव्हर गोलंदाजी करु शकतो, अशी त्याची स्थिती आहे. हार्दिक पांड्या त्याच्या पूर्ण क्षमतेनं खेळतो त्यावेळी त्यानं सर्वोतकृष्ट खेळ केलेला आहे. तो फिट असल्याचं विराटनं सांगितलं आहे. आज टीम इंडियाची घोषणा होणार नसल्याचं विराट कोहलीनं सांगितलं आहे.

पाकिस्तानच्या मॅचसाठी तयारी

पाकिस्तानच्या किंवा जगातील कोणत्याही टीम विरोधात खेळताना पूर्ण क्षमतेनं आणि विश्वासानं सामोरं जातो. आम्ही पाकिस्तानच्या मॅचसाठी पूर्ण तयारी केली असून मॅच जिंकण्यावर आमचं लक्ष असेल, असं विराट कोहली म्हणाले.

आयपीएलमध्ये देखील आयसीसीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या पिचेस सारख्या पिचेस तयार करण्यात येतात. टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये क्लॅरिटी ऑफ थॉट हे खूप महत्वाचं असतं. तीन ते चार चेंडूमध्ये मॅच बदलली जाते. गोलंदाजाच्या एका ओव्हरमध्ये हे चित्र बदलतं. आयपीएलमध्ये आम्ही जे क्रिकेट खेळलो त्याचा आम्हाला फायदा होईल, असं विराट कोहली म्हणाला.

इतिहासाचा विचार करत नाही

आम्ही पाकिस्तान विरोधात यापूर्वी काय खेळ केला, आम्ही त्यांनी कितीवेळा पराभूत केलं याचा आम्ही विचार केला नाही. आमचं लक्ष त्या दिवशीच्या खेळावर आहे. त्या मॅचची आम्ही चांगली तयारी करतोय. पाकिस्तान ही चांगली टीम असून त्यांच्या विरोधात चांगली तयारी करुन खेळावं लागतं. आमचं लक्ष कामगिरीत सातत्य ठेवण्यावर असेल, असं विराट कोहली म्हणाला.

इतर बातम्या

T20 World Cup 2021, India vs England: सराव सामन्यात भारताची सरशी, इंग्लडवर 7 गडी राखून विजय

T20 World Cup 2021: इंग्लंडचा संघ अडचणीत, भारताविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान धडाकेबाज खेळाडू जखमी

T20 World Cup 2021: श्रीलंकेचा नाम्बियावर 7 विकेट्सनी विजय, पण चर्चा ‘त्या’ कॅचची

Virat Kohli said team India will focus on winning Match against Pakistan in T20 World Cup