T20 World Cup 2021: इंग्लंडचा संघ अडचणीत, भारताविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान धडाकेबाज खेळाडू जखमी

टी -20 विश्वचषकाचे मुख्य सामने सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा संघ अडचणीत आहे. त्यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याद्वारे मोहिमेची सुरुवात करायची आहे. पण त्याआधीच इंग्लंडचा संघ अडचणीत आला आहे.

T20 World Cup 2021: इंग्लंडचा संघ अडचणीत, भारताविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान धडाकेबाज खेळाडू जखमी
Liam Livingstone

दुबई : टी -20 विश्वचषकाचे मुख्य सामने सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा संघ अडचणीत आहे. त्यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याद्वारे मोहिमेची सुरुवात करायची आहे. पण त्याआधीच इंग्लंडचा संघ अडचणीत आला आहे. भारताविरुद्ध खेळवलेल्या सराव सामन्यादरम्यान हे संकट उद्भवले आहे. या सामन्यात त्यांच्या एका महत्त्वाच्या खेळाडूला झालेल्या दुखापतीमुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. लियाम लिव्हिंग्स्टन असे या जखमी खेळाडूचे नाव आहे. सराव सामन्यादरम्यान टी 20 क्रिकेटच्या या मोठ्या दिग्गजाच्या बोटाला दुखापत झाली आहे, ज्यामुळे त्याचे स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात खेळणे कठीण झाले आहे. (Liam Livingstone in doubt for T20 World Cup match after injuring finger in warm-up match against India)

मिडविकेट क्षेत्रातील इशान किशनचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात असताना लिव्हिंग्स्टन जखमी झाला. ख्रिस जॉर्डन त्यावेळी गोलंदाजी करत होता. मैदानावरील प्रकाशामुळे लिव्हिंगस्टनला हा झेल पकडण्यात अडचण आली. असे नाही की त्याने यापूर्वी असे झेल पकडले नाहीत. पण हा सराव सामना आयसीसी अकादमी मैदानावर खेळला जात होता, जेथे आंतरराष्ट्रीय मैदानांवरील प्रकाशापेक्षा प्रकाश कमी असतो. कमी प्रकाशामुळे लियामलाही दुखापत झाली, ज्यामुळे त्याला खूप वेदना झाल्या. ज्या बोटाला दुखापत झाली, तिथे सूज आली होती.

पुढच्या सराव सामन्यात विश्रांती

लियाम लिव्हिंग्स्टनच्या डाव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली आहे. त्याला दुखापत होताच त्याने इंग्लंड संघाच्या फिजिओसह मैदान सोडले. त्याच्या जागी सॅम बिलिंग्स पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आला. लिव्हिंग्स्टनच्या दुखापतीबाबत इंग्लंड संघाचे प्रवक्ते म्हणाले, आम्ही त्याच्या दुखापतीची चौकशी करत आहोत. पुढील 24 तासांत, आपण त्याच्या दुखापतीची स्थिती आणि सूज बघू. तूर्तास, त्याचे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात खेळणे कठीण दिसत आहे.

सराव सामन्यात भारताची सरशी

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताने सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. त्यानंतर इंग्लंडने मात्र दमदार फलंदाजी करत 188 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. यामध्ये बेयरस्टोच्या 49, लियामच्या 30 धावांसह मोईन अलीने अखेरच्या काही षटकात 20 चेंडूत केलेल्या नाबाद 43 धावांनी धावसंख्या वाढवण्यात मोठं योगदान दिलं. ज्यामुळे संघाचा स्कोर भलामोठा झाला. भारताकडून गोलंदाजीत शमीने उत्तम गोलंदाजी करत महत्त्वाच्या 3 विकेट्स घेतल्या. तर राहुल चाहर आणि बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली. ज्यामुळे भारताला विजयासाठी 189 धावांचे आव्हान होते.

189 अशा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेले भारतीय फलंदाज सुरुवातीपासून चांगल्या लयीत होते. आज रोहित शर्मा नसल्याने केएल राहुल सोबत इशान किशन सलामीला आला. यावेळी 82 धावापर्यंत एकही विकेट गेली नव्हता. तोवर राहुलने 51 धावा करत अर्धशतकही लगावलं. राहुल अर्धशतक होताच बाद झाला. ज्यानंतर कोहलीही 11 धावा करुन बाद झाला. पण इशानने मात्र धमाकेदार फलंदाजी सुरु ठेवली पण अखेर 70 धावा झाल्या असताना त्याने विश्रांती घेण्यासाठी स्वत:हून माघार घेतली. त्यानंतर सूर्यकुमार 8 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर ऋषभ पंतने (नाबाद 29) आणि हार्दीकने (नाबाद 12) एक ओव्हर राखून भारताला विजय मिळवून दिला.

इतर बातम्या

…नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो, हार्दीक पंड्याने सांगितली व्यथा

कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यास भारताला मोठं नुकसान, दंडही भरावा लागू शकतो

(Liam Livingstone in doubt for T20 World Cup match after injuring finger in warm-up match against India)

Published On - 10:42 am, Tue, 19 October 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI