AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup साठी विराट कोहलीचा खास प्लान, मुंबईच्या मैदानातून सुरु होणार अभियान

आशिया कपसाठी (Asia Cup) टीम इंडियाची (Team India) निवड झाली आहे. 15 सदस्यीय भारतीय संघात विराट कोहलीचा (Virat Kohli) समावेश करण्यात आला आहे.

Asia Cup साठी विराट कोहलीचा खास प्लान, मुंबईच्या मैदानातून सुरु होणार अभियान
virat-kohliImage Credit source: twitter
| Updated on: Aug 09, 2022 | 11:44 AM
Share

मुंबई: आशिया कपसाठी (Asia Cup) टीम इंडियाची (Team India) निवड झाली आहे. 15 सदस्यीय भारतीय संघात विराट कोहलीचा (Virat Kohli) समावेश करण्यात आला आहे. दीर्घ विश्रांती नंतर तो संघात पुनरागमन करणार आहे. संघात पुनरागमन केल्यानंतर टीमला आशिया चषक स्पर्धेत विजय मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी विराटने रणनितीची आखणी सुद्धा केली आहे. याची सुरुवात तो याच आठवड्यात मुंबईच्या मैदानात करणार आहे. फक्त आशिया कप स्पर्धेसाठीच नाही, तर आपला हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी विराट कोहलीने हा प्लान बनवला आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यापासूनच विराट कोहली टीम इंडियाच्या बाहेर आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी सुद्धा त्याचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. विराट या दरम्यान ब्रेक वर होता. आता त्याचा विश्रांतीचा कालावधी संपला आहे. एका नव्या रणनितीसह तो आशिया कप स्पर्धेत उतरणार आहे.

MCA च्या इंडोर अकादमीत विराट कोहली करणार प्रॅक्टिस

Insidesport.in सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहली या आठवड्यापासून आशिया कपसाठी प्रॅक्टिस सुरु करणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथी MCA इंडोर अकादमीत तो सराव सुरु करणार आहे. मुंबईत विराटच घर वरळी मध्ये आहे. इथून MCA ची इंडोर अकादमी 20 मिनिट अंतरावर आहे. म्हणून विराटने अभ्यासासाठी अकादमीची निवड केलीय. कोहलीने आपली फिजिकल ट्रेनिंग घरातच बनवलेल्या जीम मध्ये सुरु केली आहे.

आशिया कपसाठी ‘विराट’ प्रॅक्टिस

आशिया कप स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरु होतेय. ही स्पर्धा 11 सप्टेंबरपर्यंत चालेल. पहिला सामना अफगाणिस्तान आणि बांगलादेश मध्ये होईल. दुसऱ्या सामन्यात 28 ऑगस्टला भारत आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळेल. ब्रेक नंतर विराट कोहली पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. आशिया कप मध्ये त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. आशिया कपच्या या सीजन मध्ये त्याने तोच रेकॉर्ड कायम ठेवावा, अशी देशवासियांची इच्छा असेल. मुंबईतील सराव हे विराट कोहलीने स्वत:ला सिद्ध करण्याच्या दिशेने उचललेल एक पाऊल आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप