WTC Final: विराटसह करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर होऊ शकतो, कारण…

| Updated on: Jun 16, 2021 | 5:29 PM

भारत आणि न्यूझीलंडमध्ये 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष या सामन्याकडे आहे.

WTC Final: विराटसह करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर होऊ शकतो, कारण...
विराट आणि केन
Follow us on

मुंबई : कसोटी क्रिकेटचा विश्वचषक समजला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला (WTC Final) भारत (India) आणि न्यूझीलंड (NewZeland) यांच्यात 18 जूनपासून सुरुवात होईल. दोन्ही संघ आय़सीसीच्या कसोटी रँकिगमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असल्याने मुकाबला चुरशीचा होणार हे नक्की. न्यूझीलंडने नुकतेच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकत भारताला चेतावणी दिली. त्यामुळे न्यूझीलंडचे आव्हान भारतासाठी अवघड असणारच आहे. पण सोबतच आणखी एक गोष्ट आहे जी भारतासाठी धोकादायक आहे. ती म्हणजे सामना असलेलं मैदान… इंग्लंडच्या साऊदम्प्टन मैदानावर (Southampton Ground) हा सामना असून या मैदानावरील भारतीय संघाचा रेकॉर्ड खराब आहे.

भारतीय क्रिकेट संघ आतापर्यंत साऊदम्प्टनच्या मैदानावर केवळ दोनच सामने खेळला आहे. दोन्ही सामन्यांत भारताला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारताला WTC Final साठी या गोष्टीचा विचार करुनच मैदानात उतरावे लागेल. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाने या मैदानावर एकही सामना खेळलेला नाही.

असा आहे रेकॉर्ड

भारतीय संघाने साऊदम्प्टन मैदानावरया पहिली कसोटी 27 ते 31 जुलै, 2014 च्या दरम्यान खेळली होती. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात इंग्लंडने पहिला डाव 7 विकेट्सच्या मोबदल्यात सुमारे 569 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर भारत केवळ 330 रनच करु शकला. दुसऱ्या डावांत इंग्लंडने 4 विकेटच्या बदल्यात 205 धावा केल्या त्यामुळे भारताना विजयासाठी 445 धावांची गरज होती. त्यावेळी भारत केवळ 178 धावा करु शकला ज्यामुळे तब्बल 266 धावांनी भारताला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर, 2018 च्या दरम्यान पुन्हा भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना पार पडला. त्यावेळी भारताने इंग्लंडला 246 धावांवर बाद करत 273 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावांत इंग्लंडने 271 धावा केल्या. ज्यामुळे भारताना विजयासाठी केवळ 245 धावांच लक्ष्य होतं. मात्र भारतीय संघ 184 वर ऑलआऊट झाला आणि 60 धावांनी सामन्यात पराभूत झाला.

एक नजर साऊदम्प्टनच्या मैदानावर

– 25 हजार प्रेक्षकांची क्षमता असणाऱ्या या मैदानावर आतापर्यत 6 कसोटी सामने खेळवले गेले आहेत.

– पहिला सामना 16 जून 2011 ला इंग्‍लंड आणि श्रीलंका याच्यात ड्रॉ झाला होता.

– मैदानवर इंग्लंडच्या संघाने सर्वाधिक 583 धावा केल्या आहेत. 2020 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या डावात हा स्कोर झाला आहे.

– सर्वांत कमी धावसंख्या भारतीय संघाने 2014 मध्ये इंग्लंड विरुद्ध केली होती. 178 धावांवर भारताचा डाव समेटला होता.

– इंग्लंडच्या जॅक क्राउले याने 2020 मध्ये पाकिस्‍तान विरोधात 267 धावा केल्या होत्या हाच या मैदानावरील व्यक्तीगत सर्वोच्च स्कोर आहे.

– तर सर्वांत चांगली गोलंदाजी वेस्ट इंडिजच्या जेसन होल्‍डरने केली होती. त्याने एका डावांत केवळ 42 धावा देत 6 विकेट पटकावल्या होत्या.

हे ही वाचा :

WTC फायनलसाठी जिगरबाज KL राहुलला संघात जागा नाही, नेटकऱ्यांचा सोशल मीडियावर संताप