WTC Final : इतिहासापासून धडा घेणार, साऊथहॅम्प्टनमध्ये अश्विनचा करिश्मा?, किवींना आस्मान दाखवायचं ठरलं!

साऊथहॅम्प्टनमधील या सामन्यासाठी भारतीय संघाबद्दल सर्वाधिक चर्चा होतीय ती म्हणजे 4 वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू खेळणार की तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू खेळणार....? (India vs New Zealand WTC Final R Ashwin impact in Southampton like Moin Ali)

WTC Final : इतिहासापासून धडा घेणार, साऊथहॅम्प्टनमध्ये अश्विनचा करिश्मा?, किवींना आस्मान दाखवायचं ठरलं!
आर अश्विन
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 7:50 AM

मुंबई : इंग्लंडमध्ये कसोटी सामना आहे याचा अर्थ वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार, हे सर्वांनाच माहिती आहे. वेग नव्हे तर स्विंग, गोलंदाजासाठी महत्त्वाचं आहे. वेगवान गोलंदाजांमुळे विरोधी फलंदाजांना खेळपट्टीवर टिकणे अवघड होऊन बसतं, असा इंग्लंडमधला एकंदरित अनुभव आहे. अशा परिस्थितीत भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जूनपासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (WTC Final 2021) खेळला जाणार आहे. (India vs New Zealand WTC Final R Ashwin impact in Southampton like Moin Ali)

ज्या मैदानावर फायनल होणार आहे ते मैदान साऊथहॅम्प्टनचं आहे आणि इंग्लंडच्या उर्वरित मैदानाप्रमाणे वेगवान गोलंदाजांनाही इथं मदत मिळेल असा विश्वास आहे. खेळपट्टी फिरकीपटूंसाठीही उपयुक्त ठरू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. इंग्लंड क्रिकेटचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ मार्क निकोलस यांनी 2014 चे उदाहरण देत म्हटलंय की, रविचंद्रन अश्विन अंतिम फेरीत महत्त्वपूर्ण ठरु शकेल.

अश्विन की जाडेजा कोण खेळणार की दोघांनाही संधी मिळणार?

साऊथहॅम्प्टनमधील या सामन्यासाठी भारतीय संघाबद्दल सर्वाधिक चर्चा होतीय ती म्हणजे 4 वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू खेळणार की तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू खेळणार….? चार वेगवान गोलंदाज खेळले तर रविंद्र जडेजा आणि अश्विन यांच्यात कोणाला संधी मिळते हा मोठा प्रश्न आहे. अश्विनची अलीकडील कामगिरी चांगली झाली आहे, तर जडेजाने फलंदाजीत सुधारणा केली आहे. अशा परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण स्थान मिळवू शकेल, असा यक्ष प्रश्न आहे.

फिरकीला मदत, अश्विनला फायदा

इंग्लंड क्रिकेटचे तज्ज्ञ मार्क निकॉल्स यांनी महत्त्वपूर्ण मत मांडलंय. साऊथहॅम्प्टनचं मैदान स्पिनर्ससाठी उपयुक्त ठरलं आहे. स्पिनरला तिथे मदत मिळते. ईएसपीएन- क्रिकइन्फोसाठी लिहिलेल्या लेखात साऊथहॅम्प्टनमधील परिस्थिती त्यांनी अधिक स्पष्ट करुन सांगितली आहे. 2014 सालचं उदाहरण देत त्यांनी म्हटलंय,

“हे एक चांगलं मैदान आहे तिथे चांगल्या सुविधा, चांगल्या आकाराच्या सीमारेषा आणि परिपूर्ण खेळपट्टी आहे. कोरड्या हवामानात इथे बॉल स्पिन होतो.2014 मध्ये मोईन अलीने आपल्या ऑफ-ब्रेकच्या चेंडूने इंग्लंडला भारताविरुद्ध विजय मिळवून दिला. त्याने भारताच्या 6 विकेट्स काढल्या होत्या. आता अश्विनही अशीच कमाल दाखवू शकतो. अश्विन या अंतिम सामन्यात धमाल करु शकतो”, असं त्यांनी म्हटलंय.

साऊथहॅम्प्टनच्या मैदानावर थरार

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना 18 जूनला सुरु होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघ सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. बीसीसीआयनं WTC फायनलसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यांच्या नावांची घोषणा केली आहे.

टीम इंडियाचे 15 शिलेदार

भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धिमान साहा रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे.

(India vs New Zealand WTC Final R Ashwin impact in Southampton like Moin Ali)

हे ही वाचा :

WTC फायनलसाठी जिगरबाज KL राहुलला संघात जागा नाही, नेटकऱ्यांचा सोशल मीडियावर संताप

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.