AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC फायनलसाठी जिगरबाज KL राहुलला संघात जागा नाही, नेटकऱ्यांचा सोशल मीडियावर संताप

. बीसीसीआयनं WTC फायनलसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यांच्या नावांची घोषणा केली आहे. या 15 सदस्यांमध्ये धडाकेबाज खेळाडू के एल राहुलला संधी देण्यात आलेली नाही. (India vs New Zealand KL Rahul not Selected Word Test Championship Final Squad)

WTC फायनलसाठी जिगरबाज KL राहुलला संघात जागा नाही, नेटकऱ्यांचा सोशल मीडियावर संताप
KL Rahul
| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 7:09 AM
Share

मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना (WTC final) 18 जूनला सुरु होणार आहे. भारत आणि न्‍यूझीलंड (India vs New Zealand) दोन्ही संघ सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. बीसीसीआयनं WTC फायनलसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यांच्या नावांची घोषणा केली आहे. या 15 सदस्यांमध्ये धडाकेबाज खेळाडू के एल राहुलला (KL Rahul) संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केलाय. (India vs New Zealand KL Rahul not Selected Word Test Championship Final Squad)

के एल राहुलला संधी नाही

के एल राहुलला आयपीएल मोसमात पोटाच्या दुखापतीमुळे शेवटच्या काही सामन्यांना मुकावं लागलं. त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अगदी महिभरात तो सावरला. इंग्लंड दौऱ्यासाठीची सगळी तयारी त्याने पूर्ण केली. इतकं सगळं होऊनही 15 सदस्यीय संघात त्याला स्थान दिलं गेलं नाही. साहजिकच सोशल मीडियावर लोकांना संताप अनावर झाला आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप

के एल राहुलला संघात स्थान न दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तसंच संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर टीकास्त्र सोडलंय. सोशल मीडियावर लोकांनी विविध प्रतिक्रिया लिहून संग व्यवस्थापनावर टीका केलीय. जर त्याचा समावेश अंतिम 15 मध्ये करायचा नव्हता तर तर त्याला श्रीलंका दौऱ्यावर का पाठवलं नाही किंवा का पाठवू नये… जिगरबाज राहुलचा अंतिम 15 मध्ये समावेश व्हायलाच हवा होता… शुभमनच्याऐवजी राहुलची ती जागा होती, अशा प्रतिक्रिया लोकांनी सोशल मीडियावर नोंदवल्या आहेत.

साहाऐवजी रिषभची वर्णी निश्चित

बीसीसीआयने 15 सदस्यीय संघात ऋद्धिमान साहा आणि रिषभ पंतचा समावेश केला आहे. दोघेही विकेट किपींग करतात, तर उजव्या हाताने फलंदाजी करतात. अंतिम 11 मध्ये साहाऐवजी रिषभची वर्णी निश्चित मानली जातीय.

टीम इंडियाचे 15 शिलेदार

भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धिमान साहा रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे.

(India vs New Zealand KL Rahul not Selected Word Test Championship Final Squad)

हे ही वाचा :

WTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश?

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.