AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 36 व्या वर्षी कोहलीची क्रिकेटमधून निवृत्ती, असा राहिला आतापर्यंतचा प्रवास

गेल्या काही दिवसात एका मागोमाग एक अशा निवृत्तीच्या घोषणा होत आह. आता कोहलीनेही निवृत्तीचा मार्ग स्वीकारला क्रिकेटला कायमचा रामराम ठोकला आहे. अंडर 19 वर्ल्डकपपासून सुरु झालेला प्रवास आयपीएलपर्यंत संपुष्टात आला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कोहलीची कामगिरी जबरदस्त राहिली आहे.

वयाच्या 36 व्या वर्षी कोहलीची क्रिकेटमधून निवृत्ती, असा राहिला आतापर्यंतचा प्रवास
कोहलीने क्रिकेटविश्वाला ठोकला रामराम, अखेर ते स्वप्न राहिलं अधुरं
| Updated on: Feb 20, 2024 | 7:31 PM
Share

मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरु असताना क्रीडाविश्वात अनेक घडामोडी घडत आहेत. गेल्या महिनाभरात डझनभर दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली असताना आणखी एक नाव समोर आलं आहे. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वात आणखी एक कोहली खेळला होता.2008 अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद टीम इंडियाने मिळवलं होतं. त्यावेळेस तरूवर कोहली संघासाठी ओपनिंग करत होता. आता वयाच्या 36 व्या वर्षी तरुवर कोहलीने क्रिकेटविश्वाला रामराम ठोकला आहे. तरुवर कोहली फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. पण टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली नाही. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर त्रिशतकाची नोंद आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 53 राहिली आणि त्याने 14 शतकंही ठोकली आहेत. तरुवर कोहलीला टीम इंडियात स्थान मिळालं नाही पण आयपीएलमध्ये काही खास करू शकला नाही. त्यामुळे क्रीडारसिकांचं लक्ष वेधून घेण्यात अपय़शली ठरला. 2009-2010 दरम्यात त्याच्या क्रिकेट कारकिर्दिला गळती लागण्यास सुरुवात झाली होती. पण 2013 मध्ये रणजी ट्रॉफीत त्रिशतक ठोकत पुन्हा एकदा चर्चेत आला होता.

तरुवर कोहलीने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 55 सामने खेळले आणि 97 डावात 4573 धावा केल्या. यात 74 विकेट्सही नावावर आहे. या व्यतिरिक्त लिस्ट एमधेय कोहलीने 72 सामने खेळले आणि 1913 धावा केल्या. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 14 शतकं आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त लिस्ट ए मध्ये 3 शतकं, 11 अर्धशतकं आणि 41 विकेट्स आहेत.

तरुवर कोहलीचा जन्म 17 डिसेंबर 1988 रोजी पंजाबच्या जालंधरमध्ये झाला. तरुवर राईट हँडेड बॅट्समन होता. तसेच राइट आर्म मीडियम गोलंदाजी करायचा. आयपीएल 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने खरेदी केलं होतं. तेव्हा पहिलं पर्व राजस्थानने आपल्या नावावर केलं होतं. त्यानंतर 2009 मध्ये पंजाब किंग्सने खरेदी केलं.

अंडर 19 वर्ल्डकप 2008 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. भारताने 159 धावा करत विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. तरुवर कोहली ओपनिंगला उतरला होता. पण काही खास करू शकला नाही. 10 चेंडूचा सामना करत 1 धाव करून बाद झाला होता. तर विराट कोहलीने या सामन्यात 19 धावा केल्या होत्या. भारताने हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार 12 धावांनी जिंकला होता.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.