AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडिया आणि विराट कोहलीबाबत इंग्लंडच्या खेळाडूची मोठी भविष्यवाणी

T20 world cup 2024 final : भारतीय संघ विजयासाठी सज्ज झाला आहे. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया चांगली कामगिरी करुन कप घरी आणेल अशी अपेक्षा सर्व भारतीय चाहते करत आहेत. सामन्याच्या आधी इंग्लंडच्या एका माजी खेळाडूने मोठी भविष्यावाणी केली आहे.

टीम इंडिया आणि विराट कोहलीबाबत इंग्लंडच्या खेळाडूची मोठी भविष्यवाणी
india vs south africa
| Updated on: Jun 29, 2024 | 4:52 PM
Share

India vs South Africa : T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना आज रात्री 8 वाजता रंगणार आहे. टी-20 क्रिकेटचा नवा चॅम्पियन बनण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही सज्ज झाले आहेत. या स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित राहिले आहेत. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील नवा चॅम्पियन कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान आज सकाळी मैदानावर मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे पाऊस खेळ बिघडवणार का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

भारतासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ती सलामीच्या जोडीकडून चांगल्या खेळीची. सलामीच्या जोडीने जर चांगली सुरुवात करुन दिली तर मग पुढील खेळाडूंना मोठी धावसंख्या बनवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीची बॅट या स्पर्धेत आतापर्यंत शांत राहिली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने विराट कोहलीचा फॉर्म आणि सामन्याच्या निकालाबाबत मोठे भाकीत केले आहे.

विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज मॉन्टी पानेसरने मोठी भविष्यवाणी केली आहे. मॉन्टी पानेसरने एका वृत्तसंस्थेशी बोलताना विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

इंग्लंड क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज पनेसरने फायनल सामन्यात विराट कोहली हा सामनावीर ठरणार असं म्हटलं आहे. विराट कोहली अंतिम सामन्यात चांगली फलंदाजी करेल. विराट या मोठ्या सामन्यात टीम इंडियासाठी शतक झळकावणार आहे. तो या खेळीद्वारे त्याच्यावर उपस्थित होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. त्याचबरोबर या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. भारत ज्या लयीने खेळत आहे तोच त्यांना चॅम्पियन बनवेल.

विराट कोहलीची कामगिरी कशी होती?

विराट कोहलीने आतापर्यंत अत्यंत खराब कामगिरी केली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत या स्पर्धेतील 7 सामन्यात केवळ 75 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही केवळ 100 आहे. विराटची सर्वोच्च धावसंख्या 37 आहे. विराट कोहलीने पूर्ण वर्ल्डकपमध्ये केवळ 2 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. विराट कोहलीने खाते न उघडताच दोनदा आऊट झाला आहे. त्याच्या सलामीच्या फलंदाजीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. विराट कोहली हा नेहमीच टीम इंडियासाठी संकटमोचक ठरला आहे. त्याने अनेकदा कठीण वेळेत देखील चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळे त्याच्याकडून या अंतिम सामन्याच चांगल्या खेळीची अपेक्षा केली जात आहे. विराटची बॅट आज चालली तर भारतीय संघ नक्कीच सामना जिंकून ट्रॉफी घरी आणू शकतो.

बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.