
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 192 धावा केल्या आहेत. तसेच विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताकडे चौथ्या दिवशी काही तास आणि एक अख्खा दिवस आहे. आता भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे. लक्ष्य सोपं वाटत असलं तर ते गाठणं वाटतं तितकं सोपं नाही, याची जाणीव क्रीडाप्रेमींना आहे. लॉर्ड्सवर भारताचा रेकॉर्ड काही खास नाही. आतापर्यंत झालेल्या 19 पैकी 4 सामन्यात विजय मिळाला आहे. असं असताना या सामन्यातील पहिल्या डावात जो रूटने शतकी खेळी करून भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं होतं. दुसऱ्या डावातही त्याला अम्पायर कॉलमुळे जीवदान मिळालं. त्यामुळे पुढे जाऊन रूट घातक ठरणार हे सर्वांना माहिती होतं. पण तो 40 धावांवर असताना वॉशिंग्टन सुंदरने त्याची विकेट काढली.
जो रूटने 96 चेंडूंचा सामना करत 40 धावांची खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरने जो रूटला दुसऱ्या डावाच्या 43व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चकवलं आणि क्लिन बोल्ड केलं. सुंदरने टाकलेल्या चेंडूवर स्वीप करण्याच्या प्रयत्ना रुट फसला. या दरम्यान त्याला लेग स्टंप क्लियर दिसत होता. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर तो आत घुसला आणि स्विंगिंग बेल्ड करत लेग स्टंप घेऊन गेला. विकेट गेल्यानंतर जो रूटला पहिल्यांदा काहीच कळलं नाही. तो काही काळ फक्त त्या विकेटकडे पाहात राहीला आणि नंतर तंबूच्या दिशेने गेला.
Joe Root was starting to settle, and we all know what happens when he does…
But #WashingtonSundar had other ideas.A sharp, crucial breakthrough to stop the danger man.#ENGvIND 👉 3rd TEST, DAY 4 | LIVE NOW on JioHotstar 👉 https://t.co/vo6bbH9n2o pic.twitter.com/B5RRA3bVxV
— Star Sports (@StarSportsIndia) July 13, 2025
जो रुटने या सामन्याच्या पहिल्या डावात 177 चेंडूंचा सामना करत 13 चौकारांच्या मदतीने शतकी खेळी केली होती. कसोटी क्रिकेटमधील त्याचं 37वं शतक होतं. यासह इंग्लंडच्या भूमीवर 7000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला होता. तसेच दुसऱ्या डावात 40 धावांची खेळी करून कसोटीत चौथ्या क्रमांकावर खेळताना 8 हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे.