
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या वूमन्स टीम इंडिया ए ची हारकीरी सुरुच आहे. टीम इंडिया ए नेऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची मालिका 0-3 अशा फरकाने गमावली. त्यानंतर एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या सामन्यात विजय मिळवून कमबॅक करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न होता. मात्र टीम इंडियाची हारकीरी सुरुच आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 विकेट्सने मात करत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 250 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 18 बॉल राखून पूर्ण केलं. कांगारुंनी 47 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 47 ओव्हरमध्ये 250 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी पुढील सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.
केटी मॅक ही ऑस्ट्रेलियाच्या विजयाची नायिका ठरली. केटी मॅक हीने 126 बॉलमध्ये 11 चौकारांच्या मदतीने 129 धावांची खेळी केली. कॅप्टन ताहलिया मॅकग्रा हीने 61 बॉलमध्ये 56 रन्स केल्या. तर मॅडी डार्क आणि चार्ली नॉट या दोघींनी प्रत्येकी 27 आणि 26 अशा धावा केल्या. तर
टेस फ्लिंटॉफ हीने 5 धावांचं योगदान दिलं. तर निकोल फाल्टम आणि केट पीटरसन या दोघींनी 1-1 धाव केली. तर टीम इंडियाकडून मेघना सिंह आणि मिन्नू मणी या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 249 धावांपर्यंत मजल मारली. टीम इंडियासाठी राघवी बिस्त हीने सर्वाधिक धावा केल्या. राघवीने 102 बॉलमध्ये 6 फोरच्या मदतीने 82 रन्स केल्या. तेजल हसबनीस हीने 67 चेंडूत 53 धावांची खेळी केली. कॅप्टन मिन्नू मणी हीने 27, शिप्रा गिरी 25 आणि शुभा सतिशने 16 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियासाठी मॅटलान ब्राउन हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर निकोला हॅनकॉक आणि रेस पार्सन्स या दोघींनी 2-2 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौड सुरुच
India A’s struggle continues!
Katie Mack’s Century guides Australia A to a 4-wicket victory in the One-Day opener.#CricketTwitter #AUSvIND pic.twitter.com/eThQ2xO14C
— Female Cricket (@imfemalecricket) August 14, 2024
वूमन्स ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग ईलेव्हन : ताहलिया मॅकग्रा (कॅप्टन), केटी मॅक, मॅडी डार्क, चार्ली नॉट, टेस फ्लिंटॉफ, निकोल फाल्टम, मॅटलान ब्राउन, केट पीटरसन, ग्रेस पार्सन्स, ताहलिया विल्सन आणि निकोला हॅनकॉक,
वूमन्स इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन: मिन्नू मणी (कर्णधार), श्वेता सेहरावत, प्रिया पुनिया, शुभा सतीश, तेजल हसबनीस, राघवी बिस्त, शिप्रा गिरी, सायली सातघरे, मन्नत कश्यप आणि मेघना सिंग.