AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपांत्य फेरीत आम्ही भारताला सहज हरवलं असतं, पण…, स्टीव्ह स्मिथने सांगितलं काय झालं?

ऑस्ट्रेलिया हा संघ आयसीसी स्पर्धेत चिवट खेळी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बाद फेरीत समोर आला की क्रीडाप्रेमींना धाकधूक लागून असते. त्यात नाणेफेकीचा कौल जिंकला की ऑस्ट्रेलियाला मनासारखं करता येतं. पहिल्या चेंडूपासून दबाव टाकता येतो. पण या सामन्यात वेगळं चित्र पाहायला मिळालं. पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने कारणं सांगितलं.

उपांत्य फेरीत आम्ही भारताला सहज हरवलं असतं, पण..., स्टीव्ह स्मिथने सांगितलं काय झालं?
Image Credit source: ICC
| Updated on: Mar 04, 2025 | 11:00 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा प्रवास संपुष्टात आला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. खरं तर या मैदानावर 250 धावांचा पल्ला गाठणं कठीण होतं. याबाबत सर्वांनात माहिती होतं. ऑस्ट्रेलियाने सावध आणि चिवट खेळी करत धावसंख्या 264 पर्यंत पोहोचवली. भारतासमोर विजयासाठी 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारतासाठी खरं तर खूपच कठीण होतं. त्यामुळे भारत हे आव्हान गाठेल की नाही याबाबत शंका होती. भारताने सुरुवात चांगली केली. त्यात रोहित शर्माला दोन जीवदान मिळाले. पण त्या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरला. शुबमन गिल 8 धावा करून बाद झाल्यानंतर रोहितकडून अपेक्षा होत्या. पण रोहित शर्मा 28 धावा करून बाद झाला आणि टीम इंडियावर दबाव वाढला. पण विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलने डाव पुढे नेला. दोघांनी मिळून 34 धावा जोडल्या. विराट कोहली आणि केएल राहुलने 47 धावांची भागीदारी केली. विराट कोहली 84 धावा करून बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि हार्दिक पांड्याने विजयाच्या वेशीवर आणून सोडलं. पण या पराभवाची ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने वेगळंच कारण सांगितलं.

स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, मला वाटले की गोलंदाजांनी खरोखर चांगले काम केले, त्यांनी संपूर्ण खेळात खूप मेहनत घेतली, फिरकी गोलंदाजांनी खेळाचा गाडा खोलवर नेला. आम्हाला कदाचित काही अधिक धावा मिळू शकल्या असत्या. महत्त्वाच्या वेळी आम्ही काही विकेट गमावल्या. जर आम्ही 280+ धावा केल्या असत्या तर परिस्थिती वेगळी असती.आम्ही इंग्लंडविरुद्ध अपवादात्मकपणे चांगले खेळलो.’

ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास जर तरचा होता. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीत इंग्लंडला पराभूत केलं होतं. 300 हून अधिक धावांचं आव्हान गाठत आपला हेतू स्पष्ट केला होता. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीचं गणित जर तर वर आलं होतं. पण अफगाणिस्तानविरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द झाला आणि चार गुणांसह उपांत्य फेरी गाठली. पण गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असल्याने भारताशी सामना करावा लागला.

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?