AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : पावसामुळे गुयानामध्ये भारत-इंग्लंड सेमीफायनल सामना रद्द झाला, तर मग विजेता कसा ठरणार?

IND vs ENG : येत्या 27 जूनला गुयाना येथील प्रोव्हायडन्स स्टेडियममध्ये भारत-इंग्लंड यांच्यात सेमीफायनल 2 चा सामना होणार आहे. हवामान विभागाने या मॅचच्या दिवशी दिवसभर पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ झाला नाही, मग अशा स्थितीत फायनलसाठी विजेता संघ कसा ठरणार?

IND vs ENG : पावसामुळे गुयानामध्ये भारत-इंग्लंड सेमीफायनल सामना रद्द झाला, तर मग विजेता कसा ठरणार?
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये या सामन्यामध्ये कांगारू जखमी वाघासारखे खेळतील. आजच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर त्यांचे सेमी फायनल सामन्याचे तिकीट बांगलादेश आणि अफगाणिस्तान सामन्यावर अवलंबून राहणार आहे.
| Updated on: Jun 25, 2024 | 10:20 AM
Share

टीम इंडियाने काल सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलियाला नमवून दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी हरवलं. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 205 धावांचा डोंगर उभारला. यामध्ये कॅप्टन रोहित शर्माचा महत्त्वाचा वाटा होता. त्याने 41 चेंडूत 92 धावा चोपल्या. यात 7 फोर, 8 सिक्स होत्या. टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 181 धावा केल्या. अशा प्रकारे टीम इंडियाने आरामात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आता टीम इंडियासमोर सेमीफायनलमध्ये ग्रुप 2 मधून आलेल्या इंग्लंडच आव्हान आहे. 2022 च्या T20 वर्ल्ड कपच्या उपांत्यफेरीत इंग्लंडने टीम इंडियावर एकतर्फी विजय मिळवला होता. त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.

येत्या 27 जूनला गुयाना येथील प्रोव्हायडन्स स्टेडियममध्ये सेमीफायनल 2 चा सामना होणार आहे. या मॅचवर पावसाच सावट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, भारत-इंग्लंड सेमीफायनल मॅचवर पाऊस पाणी फिरवू शकतो. 27 जूनला गुयानामध्ये दिवसभर पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवसभर पाऊस कोसळल्यामुळे सामना रद्द झाला, तर मग अशा स्थितीत सेमीफायनलचा निकाल कसा लागणार? फायनलमध्ये कोण प्रवेश करणार भारत की इंग्लंड?

पाऊस कोसळण्याची शक्यता किती टक्के?

अ‍ॅक्यु वेदरने 27 जूनला गुयानामध्ये 88 टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. 18 टक्के वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजमधील स्थानिक वेळेनुसार, सकाळी 10.30 वाजता सामना सुरु होणार आहे. एकही चेंडू न टाकता सामना रद्द झाला, तर अशा स्थितीत टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. कारण सुपर-8 स्टेजमध्ये टीम इंडिया टॉपवर आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया तिन्ही संघांविरुद्ध सामने जिंकले आहेत. पावसामुळे सामना रद्द झाला, तर दुसऱ्या सेमीफायनलचा रिझल्ट असा असेल.

राखीव दिवस नाही का?

गुयानामध्ये सेमीफायनल सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. पण पावसाची शक्यता लक्षात घेऊन सामन्याचा निकाल लावण्यासाठी अतिरिक्त 250 मिनिट देण्यात आली आहेत. पहिला सेमीफायनल सामना त्रिनिदाद येथे होणार आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.