AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : राजस्थानने दुर्लक्ष केलं, Mumbai Indians ने घडवलं, पण संधी दिली दुसऱ्याच टीमने

IPL 2023 : मुंबई इंडियन्सशी कनेक्शन असलेल्या बॉलरबद्दल जाणून घ्या. पंजाबचा ऑलराऊडंर राज अंगद बावा या सीजनमध्ये खेळत नाहीय. त्याला दुखापत झालीय. त्याच्याजागी गुरनूरला संधी मिळाली.

IPL 2023 : राजस्थानने दुर्लक्ष केलं, Mumbai Indians ने घडवलं, पण संधी दिली दुसऱ्याच टीमने
IPL 2023Image Credit source: twitter
| Updated on: Apr 29, 2023 | 12:30 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 मध्ये शुक्वारी पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना झाला. दोन्ही टीम्सध्ये सीजनमधील हा दुसरा सामना होता. पहिल्या सामन्यात पंजाबने लखनौवर विजय मिळवला होता. कालच्या सामन्यात लखनौने पंजाबवर 56 धावांनी मोठा विजय मिळवला. शिखर धवनने या मॅचमध्ये एका नव्या गोलंदाजाला संधी दिली. त्याच नाव आहे गुरनूर बराड.

गुरनूरला पंजाबने लिलावात विकत घेतलं नव्हतं. तो एक रिप्लेसमेंट म्हणून टीममध्ये आला. पंजाबचा ऑलराऊडंर राज अंगद बावा या सीजनमध्ये खेळत नाहीय. त्याला दुखापत झालीय. त्याच्याजागी गुरनूरला संधी मिळाली. काल तो आयपीएलमध्ये आपला पहिला सामना खेळला.

मुंबई इंडियन्सचा रोल महत्वाचा

गुरनूरला पंजाबकडून आयपीएलमध्ये डेब्युची संधी मिळाली. पण त्याला इथपर्यंत पोहोचवण्यात मुंबई इंडियन्सच महत्वाच योगदान आहे. मुंबई इंडियन्सच्या रिलायन्स क्रिकेट अकादमीत गुरनूर खेळलाय. मुंबईच्या टीमसोबत 2022 साली तो इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी तो काही सामने खेळला. केंट आणि ससेक्स विरुद्ध तो मॅच खेळला.

मुंबईकडून इंग्लंडमध्ये खेळला

जयदेव उनाडकटसोबत त्याने गोलंदाजी केली होती. केंटच्या दुसऱ्या डिविजनच्या टीम विरोधात 34 धावा देऊन 2 विकेट काढल्या होत्या. ससेक्स विरुद्ध त्याला विकेट मिळाली नाही. दोन ओव्हर्समध्ये त्याने 12 धावा दिल्या होत्या.

रणजीत दाखवली बॅटची कमाल

गुरनूर फक्त बॉलर नाहीय, तो बॅटने सुद्धा कमाल दाखवू शकतो. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने यावर्षी नवव्या नंबरवर येऊन शानदार बॅटिंग केली. टीमची धावसंख्या 7 बाद 147 होती. त्यावेळी 64 चेंडूत तो 60 धावांची तुफान इनिंग खेळला. जम्मू-काश्मीर विरुद्ध तो ही इनिंग खेळला. गुरनूर मोहालीमध्ये ही इनिंग खेळला होता. ही मॅच पंजाब किंग्सने जिंकली.

राजस्थान रॉयल्सकडून दुर्लक्ष

गुरनूर 2019 मध्ये रेड बुल कॅम्पस 2019 विजेत्या टीमचा भाग होता. या मॅचमध्ये त्याने 16 रन्स देऊन 3 विकेट काढले. आपल्या टीमला एक रन्सने मॅच जिंकून देण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावलेली. फायनल सामना सवाई मानसिंह स्टेडियममध्ये झाला होता. त्या मॅचमध्ये तो राजस्थान रॉयल्सचा स्काऊटस होता. पण राजस्थानने त्याला नाही निवडलं. मुंबई इंडियन्सने नेट बॉलर म्हणून त्याची निवड केली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.