
आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद मिळवल्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. गेली 17 वर्षे चषक नाही म्हणून सोशल मीडियावर डिवचलं जात होतं. पण चषक हाती आल्याने डिवचण्याची संधीच मिळणार नाही, म्हणून कार्यकर्ते उत्साही होते. त्यामुळे आपल्या संघाची एक झलक पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. विजयी जल्लोषाचे प्रत्येक क्षण डोळ्यात साठवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न होता. पण एका क्षणात या आनंदावर विरजण पडलं. काही कळायच्या आत चेंगराचेंगरी झाली आणि दहा चाहत्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे आनंदाच्या क्षणी निराशेचं वातावरण पसरलं. चिन्नास्वामी स्टेडियमवर यापूर्वी असंख्य सामने झाले आहेत. लोकांनी स्टेडियमवर गर्दी केली होती. पण यासारखी भयानक दुर्घटना कधीच घडली नव्हती. या भयानक घटनेनंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, आयोजकांनी आरसीबीच्या आयपीएल विजयाच्या जल्लोषाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करायला हवे होते. दुसरीकडे, आयपीएल जिंकणाऱ्या विविध संघांनी आपापल्या शहरांमध्ये विजय साजरा केला आहे. केकेआर, मुंबई इंडियन्स, सीएसके सारख्या संघांनी भव्य केलं होतं. पण आयपीएल जिंकल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी आयोजन केलं होतं. पण आरसीबीच्या विजयानंतर यात घाई केल्याचं बोललं जात आहे.
#WATCH | Bengaluru: On the stampede during RCB victory celebrations, Karnataka BJP President BY Vijayendra says, “The state government should take full responsibility for this tragedy. When the whole country and Karnataka were celebrating RCB’s victory, the state government’s… pic.twitter.com/M7nUBc9vZN
— ANI (@ANI) June 4, 2025
सरकारने चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विजयोत्सवाचे आयोजन केले होते. त्यामुळे कर्नाटकात राजकारण तापलं आहे. कर्नाटक भाजप अध्यक्ष बी वाय विजयेंद्र म्हणाले की, “या दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे. जेव्हा संपूर्ण देश आणि कर्नाटक आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करत होते, तेव्हा राज्य सरकारने कोणतीही तयारी न करता विजय रॅली आयोजित करण्याची घाई केल्याने ही दुर्घटना घडली. रुग्णवाहिकेची सुविधा नव्हती. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश द्यावेत.”