RCB Victory Parade: विराटने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएल ट्रॉफी उचलण्यास दिला नकार , कारण..
आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद मिळवल्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गेल्या 17 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. त्यामुळे आपल्या हिरोंना पाहण्यासाठी चाहत्यांनी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गर्दी केली. यावेळी विराट कोहलीने ट्रॉफी उचलण्यास नकार दिला. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद मिळवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं बंगळुरुत जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. आरसीबीचा संपूर्ण चमू या विजयी जल्लोषात सहभागी होता. चाहत्यांनीही हा सोहळा आपल्या हृदयात साठवून ठेवण्यासाठी गर्दी केली होती. दुसरीकडे, या विजयी सोहळ्याला गालबोट लागलं. चेंगराचेंगरीत दहा चाहत्यांचा मृत्यू झाला आणि 20हून अधिक जण जखमी झाले. असं असताना चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एक वेगळीच घटना घडली. विराट कोहलीने आयपीएल ट्रॉफी उचलण्यास नकार दिला. विराट कोहलीने नाराजीतून नाही तर कर्णधार रजत पाटीदारला मान देण्यासाठी ही कृती केली. आरसीबीचा पूर्ण संघ स्टेजवर उभा होता. विराट कोहलीने या कार्यक्रमात सर्वप्रथम आपलं म्हणणं चाहत्यांसमोर मांडलं. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारने चाहत्याने आभार मानले.
आभार प्रदर्शन कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर चाहत्यांसमोर ट्रॉफी उचलण्याची वेळ आहे. तेव्हा विराट कोहलीने मनाचा मोठेपणा दाखवत हा मान कर्णधाराचा असल्याचं दाखवून दिलं. विराट कोहलीने कर्णधार रजत पाटीदारला ट्रॉफी उचलण्यास सांगितलं. विराट कोहीलने सांगितलं की, तू कर्णधार आहेस आणि ट्रॉफी तू उचलली पाहीजेस. या नंतर विराट कोहलीने ट्रॉफी उचलली आणि चाहते आनंदाने जल्लोष करू लागले.
#WATCH | Virat Kohli praises #RoyalChallengersBengaluru captain Rajat Patidar as RCB ended their 18-year-long wait and won their maiden IPL trophy yesterday after defeating Punjab Kings
“He will lead us for a long time,” says Virat Kohli
(Visuals from M Chinnaswamy Stadium in… pic.twitter.com/V1W8GrR5Qg
— ANI (@ANI) June 4, 2025
विराट कोहलीने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर चाहत्यांशी संबोधन करतान सांगितलं की, आता आमचे चाहते ई साला कप नामदे नाही तर ई साला कप नामदु असे बोलणार आहे. गेली अनेक वर्षे आरसीबीचे चाहते या घोषवाक्यासह जेतेपदाची आस बाळगून होते. आरसीबीच्या वुमन्स टीमने सर्वप्रथम ट्रॉफी मिळवून दिली होती. पण पुरुष संघ कधी मिळवेल याची आस होती. खासकरून विराट कोहली संघात असतानाच ही ट्रॉफी मिळावी अशी अपेक्षा होती. अखेर ती अपेक्षा पूर्ण झाली. आतापर्यंत दिग्गज कर्णधारांना जे जमलं नाही ते रजत पाटीदारने आरसीबीला मिळवून दिलं, हे देखील तितकंच विशेष आहे.
