कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण? आकाश चोप्राने सांगितलं असं नाव की भुवया उंचावल्या

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवानंतर पुन्हा एकदा टीम इंडिया नव्याने उभारी घेण्यास सज्ज झाली आहे. आयसीसी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या अंतिम सामन्यासाठी धडपड सुरु आहे. असं असताना आता रोहित शर्मानंतर कसोटीचं कर्णधारपद कोणाकडे येणार? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आकाश चोप्राने एक नाव सुचवलं आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण? आकाश चोप्राने सांगितलं असं नाव की भुवया उंचावल्या
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 5:55 PM

मुंबई : द्विपक्षीय मालिकांमध्ये बेस्ट पण आयसीसी स्पर्धांमध्ये फेल अशी स्थिती टीम इंडियाची आहे. आयसीसी स्पर्धेत गेल्या दहा वर्षात टीम इंडिया सातत्याने अपयशी ठरली आहे.महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत एकही आयसीसी चषक जिंकता आलेला नाही. कधी साखळी फेरीतून, कधी उपांत्य फेरीतून, तर अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यात विराट कोहलीनंतर रोहित शर्माकडे नेतृत्व सोपण्यात आलं. मात्र त्यालाही तिन्ही फॉर्मेटमध्ये अपयशाचं तोंड पाहावं लागलं. टी20 वर्ल्डकप 2022, टेस्ट चॅम्पियनशिप 2023 आणि वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पदरी अपयश पडलं. त्यामुळे आता टीम इंडियाचा आयसीसी चषकांचा दुष्काळ कोण संपवणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी आतापासून खलबतं सुरु आहेत. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू आहे. वरिष्ठ खेळाडूंनी कसोटी क्रिकेटला प्राधान्य दिलं असलं तरी रोहित शर्माची क्रिकेट कारकिर्द दोन वर्षांपेक्षा जास्त नाही. त्यामुळे रोहित शर्मानंतर टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर आकाश चोप्राने दोन नावं सुचवली आहेत.

“मी गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा करत आहे. तो शुबमन गिल होऊ शकतो. पण मी आताची गोष्ट करत नाही मी भविष्याची चर्चा करत आहे. हो यासाठी ऋषभ पंत चांगला पर्याय ठरू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंत 24 कॅरेट सोनं ठरू शकतो. तो एक चांगला पर्याय आहे. तो गेम चेंजर आहे. जेव्हा रोहित शर्मा सांगेल की कसोटी क्रिकेट संपलं. तेव्हा तुम्ही कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती कराल. तर मी नक्कीच या नावाचा विचार करेल.”, असं आकाश चोप्राने यूट्यूब चॅनेलवर सांगितलं.

ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर आहे. आता रिकव्हर होत असून सराव देखील सुरु आहे. पण पूर्णपणे फीट नसल्याचं दिसून आलं आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातून ऋषभ पंत कमबॅक करेल अशी शक्यता होती. पण 16 सदस्यीय संघात त्याचं नाव नाही. रोहित शर्मा कसोटी संघाचं नेतृत्व करणार आहे. कसोटीत ऋषभ पंतने जबरदस्त कामगिरी केली आहे. आयसीसी पुरुष टेस्ट टीम ऑफ द ईयर 2022 मध्ये निवडला गेलेला एकमेव भारतीय होता.

2022 मध्ये ऋषभ पंतने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने 12 डावात 61.81 च्या सरासरीने आमि 90.90 च्या स्ट्राईक रेटने 680 धावा केल्या होत्या. यात त्याने दोन शतकं आणि चार अर्धशतकं झळकावली होती. त्याने 21 षटकार ठोकले होते. तर विकेटमाघे त्याने सहा स्टपिंग आणि 23 झेल घेतले होते.

Non Stop LIVE Update
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन.
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप.
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना.
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?.
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार.
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?.
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं.
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास.
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.