बुमराहच्या जागी कोण खेळणार? सस्पेन्स वाढला

जसप्रीत हा टीम इंडियातून बाहेर गेल्यानं आता त्याच्या जागी कोण खेळणार, याकडे लक्ष लागून आहे.

बुमराहच्या जागी कोण खेळणार? सस्पेन्स वाढला
जसप्रीत बुमराह Image Credit source: social
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 10:39 PM

नवी दिल्ली :  टी-20 वर्ल्ड (t20 world cup 2022) कपआधीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय. बीसीसीआयनं (BCCI) आज संध्याकाळी दिलेल्या माहितीनं अनेकांची निराशा झाली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा प्रमुख गोलंदाज टीम इंडियातून बाहेर गेल्यानं आता त्याच्या जागी कोण खेळणार, याबाबत सस्पेन्स वाढला आहे. त्याच्या जागी कुणाला संधी मिळणार, याकडे अवघ्या क्रिकेटविश्वाच्या नजरा लागल्या आहेत.

मोहम्मद शमी?

बुमराहच्या  जागी कोण खेळणार याची चर्चा होत असताना सगळ्यात आधी मोहम्मद शमीचं नाव येतं. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर गोलंदाजाला पाहिजे असलेली सगळी कौशल्ये शमीकडे आहेत. त्याच्याकडे बाऊन्स आहे, त्याच्याकडे स्विंग आहे आणि त्याला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव आहे.

त्यामुळे आता शमीचं नावही सर्वाधिक चर्चेत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही शमीची निवड झालेली नाही आणि तो संघासह ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो.

दीपक चहर?

एकीकडे बुमराहच्या जागी मोहम्मद शमीचं नाव चर्चेत असलं तरी आणखी एक नाव चर्चेत आलंय. ते म्हणजे दीपक चहर. विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या संघात शमी स्टँडबायमध्ये आहे.

दीपकनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडे स्विंग आणि बाऊन्स दोन्ही आहेत आणि तो चांगली बॅटिंगही करू शकतो.

मोहम्मद सिराज?

आता जसप्रीतच्या जागी शमी आणि दीपक चहरची नावे तर तुम्ही ऐकली आता यात आणखी एका नावाची चांगलीच चर्चा सुरु आहे. ते नाव आहे मोहम्मद सिराजचं. सिराज हा बुमराहची जागा घेऊ शकतो.

सिराज खेळताना वेगवान खेळतो. त्यामुळे त्याच्याकडे देखील पाहिलं जातंय. त्याने ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण केले आणि वनडेमध्येही पदार्पण केले. तो बुमराहची जागा घेऊ शकतो.

आवेशचं नावही चर्चेत

वरचे तिन्ही नाव चर्चेत असले तरीही आणखी एका नावाचीही चर्चा आहे. ते नाव आहे आवेशचं. यानं आयपीएलमधील आपल्या कामगिरीनं सिद्ध करून दाखवलंय की तो चांगली खेळी करू शकतोय.

आवेशच्या टी-20 मध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. सिराज आणि आवेश स्टँडबायमध्येही नाहीत पण टीम इंडियामध्ये हे खेळाडू सहभागी होऊ शकतात, असं बोललं जातंय.

Non Stop LIVE Update
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले.....
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ.
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?.
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना.
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा.
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?.
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा...
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा....
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?.
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?.
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत.