Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीची कॉपी केल्याने कोणाला फटका बसणार? मॅथ्यू हेडनने स्पष्टच सांगितलं

आयर्लंडनंतर इंग्लंड दौऱ्यातही 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची चर्चा होत आहे. वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजी चाहते आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण असं असताना माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने याबाबत समज दिली आहे.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीची कॉपी केल्याने कोणाला फटका बसणार? मॅथ्यू हेडनने स्पष्टच सांगितलं
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीची कॉपी केल्याने कोणाला फटका बसणार? मॅथ्यू हेडनने स्पष्टच सांगितलं
Image Credit source: PTI/BCCI Twitter
| Updated on: Jul 04, 2026 | 7:20 PM

वैभव सूर्यवंशी मैदानात उतरला की चौकार आणि षटकारांचा वर्षाव होणार हे नक्की आहे. त्यामुळे त्याला गोलंदाजी करताना भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटतो. असं असताना त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची उत्सुकता लागून आहे. असं असलं तरी वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहण्याचा योग मागच्या काही स्पर्धांमध्ये आला आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजीचे अल्पवधीतच अनेक चाहते झाले आहेत. असं असताना अनेक क्रिकेटपटू त्याच्या फलंदाजीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू आहे. पण अनुकरण करत असताना नुकसान होऊ शकते, असा इशारा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन याने दिला आहे. मॅथ्यू हेडनने स्पष्ट सांगितलं की, जे खेळाडू वैभव सूर्यवंशीचं अनुकरण करत आहेत, त्यांनी विचार करायला हवा की ही पद्धत टिकणारी आहे का?

वैभव सूर्यवंशीचं अनुकरण केलं तर काय होईल?

मॅथ्यू हेडनने वैभव सूर्यवंशीबाबत सांगितलं की, ‘वैभव सूर्यवंशीचा बेधडक फलंदाजाची अंदाज जादुई आहे, पण सूर्यवंशीचे अनुकरण करू पाहणाऱ्या इतर खेळाडूंनी हा दृष्टिकोन टिकून राहण्याजोगा आहे की नाही याचा विचार केला पाहिजे.’ प्रत्येक खेळाडूची स्वत:ची फलंदाजीची वेगळी शैली आहे, असंही हेडन यांनी पुढे सांगितलं. यासाठी मॅथ्यू हेडनने ब्रायन लाराचं उदाहरण दिलं. ब्रायन लाराची फलंदाजी पाहून लहानाचा मोठा झालो. लाराच्या फलंदाजीचं कौतुक होतं, पण स्वत: लारा नव्हतो. हेडनच्या मते, तुम्हाला यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळू शकते, पण धावा करण्यासाठी तुम्हाला तुमचा स्वत:चा मार्ग शोधावा लागेल.

गिलच्या फलंदाजीचं कौतुक

मॅथ्यू हेडनने शुबमन गिलच्या फलंदाजीच्या शैलीचं कौतुक केलं. त्याची फलंदाजी शैली टी20 क्रिकेटसाठी अनुकूल आहे. मॅथ्यू हेडनने सांगितलं की, शुबमन गिलने सिद्ध केलं की टी20 क्रिकेटमध्ये आपल्या पद्धतीनेधावा करू शकतो. त्यामुळे वैभव सूर्यवंशीच सर्वोत्तम आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. दरम्यान, वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या विरूद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. या सामन्यात संजू सॅमसनच्या जागेवर त्याला संधी देण्यात आली आहे. तसेच अभिषेक शर्मासोबत फलंदाजीला उतरला आहे.

Follow Us