IPL 2022 RR vs SRH Head to Head: राजस्थान विरुद्ध हैदराबाद, आज होणार काँटे की टक्कर, फक्त एका विजयाने पुढे आहे हा संघ

IPL 2022 RR vs SRH Head to Head: राजस्थान विरुद्ध हैदराबाद, आज होणार काँटे की टक्कर, फक्त एका विजयाने पुढे आहे हा संघ
राजस्थान वि हैदराबाद कोणाची बाजू वरचढ
Image Credit source: File photo

पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबामध्ये (SRH vs RR) सामना होणार आहे.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 29, 2022 | 7:20 AM

पुणे: आयपीएल 2022 (IPL 2022) च्या पाचव्या सामन्यात दोन माजी विजेते परस्पराविरुद्ध खेळणार आहेत. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबामध्ये (SRH vs RR) सामना होणार आहे. दोन्ही संघाचा विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल. मागच्या काही सीजन्समध्ये राजस्थानची कामगिरी फारशी उत्साहवर्धक नाहीय. निराशाजनक प्रदर्शन त्यांनी केलं आहे. गुणतालिकेत टीम तळाला होती. मागच्यावर्षी राजस्थान रॉयल्सने कॅप्टन बदलला. पण त्याने फारशी परिस्थिती बदलली नाही. संजू सॅमसनला (Sanju Samson) आपल्या टीमकडून चांगलं प्रदर्शन करुन घेता आल नव्हतं. या सीजनमध्येही संजू सॅमसनचं कॅप्टन आहे. सनरायजर्स हैदराबादच्या कामगिरीवर नजर टाकली, तर मागच्या सीजनमध्ये हा संघ प्लेऑफ पर्यंतही पोहोचू शकला नव्हता. पण त्याआधीच्या सीजनमध्ये या टीमने दमदार प्रदर्शन केलं होतं. 2016 मध्ये सनरायजर्स हैदराबादने किताब जिंकला होता. 2018 मध्ये SRH चा संघ फायनलपर्यंत पोहोचला होता. यावेळी दोन्ही टीम्स जेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. दोन्ही फ्रेंचायजींनी नव्याने संघ बांधणी केली आहे.

हेड टू हेड

दोन्ही संघ आज आपला पहिला सामना खेळणार आहेत. त्याआधी या टीम्सच्या कामगिरीवर नजर मारली, तर सनरायजर्स हैदराबादची बाजू थोडी वरचढ आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 15 सामने झालेत. यात आठ सामने हैदराबादच्या संघाने तर सात सामने राजस्थानच्या टीमने जिंकले आहेत. हैदराबादने फक्त एक सामना जास्त जिंकला आहे. राजस्थानकडे आज हा फरक मिटवण्याची एक संधी आहे.

मागच्या पाच सामन्यातील आकडेवारी काय सांगते?

मागच्या पाच सामन्यांचे आकडे पाहिले, तर राजस्थानची टीम पुढे आहे. SRH आणि RR मध्ये झालेल्या पाच सामन्यांमध्ये राजस्थानने तीन तर हैदराबादने दोन सामने जिंकलेत. मागच्या सीजनमध्ये दोन्ही टीम्सनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. 2020 मध्येही दोन्ही संघ प्रत्येकी एक-एक सामना जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत. 2019 मध्ये लीग स्टेजमधील दुसरा सामना राजस्थानने जिंकला होता.

SRH ची संभाव्य प्लेइंग इलेवन

एडेन मार्कराम, अभिषेक शर्मा, केन विलियमसन (कॅप्टन), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकीपर), अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, रोमारियो शेपहर्ड, उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन

RR ची संभाव्य प्लेइंग इलेवन

जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कॅप्टन), शिमरोन हेटमायर, रियान पराग, जिमी नीशाम, नाथन कुल्टर नाइल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंड बोल्ट, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें