AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठवडा उलटूनही डॉक्टर नाही म्हणून पोस्टमॉर्टम नाही; Andrew Symondsच्या मृत्यूचं रहस्य कधी उलगडणार?

Andrew Symonds death: अपघाताचं नेमकं कारण काय? ते अजून पोलिसांनाही स्पष्ट नाहीय. सायमन्ड्सच्या कारने रस्ता का सोडला? ते अजूनही समजलेलं नाही.

आठवडा उलटूनही डॉक्टर नाही म्हणून पोस्टमॉर्टम नाही; Andrew Symondsच्या मृत्यूचं रहस्य कधी उलगडणार?
Andrew Symonds Image Credit source: Screengrab/Image: 9News/Twitter/AFP
| Updated on: May 20, 2022 | 12:59 PM
Share

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा (Andrew Symonds death) मागच्या आठवड्यात अपघाती मृत्यू झाला. सायमंड्सच्या मृत्यूला आता आठवडा होत आला आहे, तरी अजून त्याच्या मृतदेहाचं  (Post mortem) शवविच्छेदन झालेलं नाही. मागच्या शनिवारी रात्रीच्यावेळी क्वीन्सलँडमधील एलिस रिव्हर ब्रिजजवळच्या हरवे रेंज रोडवर अँड्र्यू सायमंड्सच्या गाडीचा अपघात (Car Accident) झाला. सायमंड्सची कार रस्ता सोडून पलटी झाली. त्यात सायमन्डसचा मृत्यू झाला. खरंतर अपघातानंतर शवविच्छेदन आणि अन्य सोपस्कार पूर्ण व्हायला जास्तीत जास्त एक ते दोन दिवस लागतात. पण अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूला आता आठवडा होत आला, तरी अजून त्याचं शवविच्छेदन झालेलं नाही. प्रशासकीय कारणांमुळे अँड्र्यू सायमंड्सच्या पोस्टमॉर्टमला विलंब होतोय. रिपोर्ट्सनुसार, टाऊन्सव्हिलेमध्ये जिथे हा अपघात झाला, तिथे पोस्टमॉर्टम करणारा डॉक्टर नाहीय. त्यामुळे सायमंन्डसच्या पोस्टमॉर्टमला विलंब होतोय.

सायमन्ड्सच्या कारने रस्ता का सोडला?

अपघाताचं नेमकं कारण काय? ते अजून पोलिसांनाही स्पष्ट नाहीय. सायमन्ड्सच्या कारने रस्ता का सोडला? ते अजूनही समजलेलं नाही. एखादा प्राणी आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात सायमन्ड्सच्या कारने रस्ता सोडला असावा, अशी एक शक्यता आहे.

टाऊन्सविलेचे अधिकारी ख्रिस लॉसन यांनी, अँड्र्यू सायमन्ड्सच्या शवविच्छेदनाला उशिर का होतोय? त्यावर उत्तर दिलं. टाऊन्सविलेमध्ये बाहेरुन दुसरा डॉक्टर आल्यानंतरच हे शवविच्छेदन शक्य आहे, असं त्यांनी सांगितलं.

बहिणीच्या वक्तव्यामुळे मृत्यूभोवतीचं रहस्य आणखी गडद

अँड्र्यूच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी एक विधान केलय, त्यामुळे सायमन्ड्सच्या मृत्यूचं रहस्य आणखी गडद झालाय. रात्रीच्यावेळी सायमन्ड्स एकटा गाडी का चालवत होता? ते आम्हाला ठाऊक नाही, असं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलय.

एक कुत्रा तर खूप संवेदनशील होता

अपघाताच्यावेळी जी महिला घटनास्थळी होती, तिने सांगितलं की, सायमंड्स सोबत त्यांची दोन कुत्री सुद्धा कारमध्ये होती. या दोन्ही श्वानांचे प्राण वाचले. “एक कुत्रा तर खूप संवेदनशील होता. तो सायमंड्सला सोडून जायला तयार नव्हता” असं तिने सांगितलं. ऑस्ट्रेलियन कुरीयर मेलने तिच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.