WI vs ENG : विंडिजने इंग्लंडविरुद्ध टॉस जिंकला, मालिका कोण जिंकणार?

West Indies vs England 3rd ODI : वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासह मालिका कोण जिंकणार? याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.

WI vs ENG : विंडिजने इंग्लंडविरुद्ध टॉस जिंकला, मालिका कोण जिंकणार?
West Indies vs England 3rd ODI tossImage Credit source: windies cricket x account
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 12:26 AM

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना हा केनिंग्सटन ओव्हल, बारबाडोस येथे खेळण्यात येत आहे. या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात यजमान वेस्ट इंडिजच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. वेस्ट इंडिजचा कॅप्टन शाई होप याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत पाहुण्या इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना तिसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे आता सामना आणि मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघामध्ये चुरस आणि रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

दोन्ही संघात 2 बदल

या निर्णायक सामन्यासाठी दोन्ही संघात प्रत्येकी 2-2 बदल करण्यात आले आहेत. विंडिजने रोमरिया शेफर्ड आणि अल्झारी जोसेफ या दोघांचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला आहे. तर शामर जोसेफ आणि जेडन सील्स या दोघांना बाहेर केलं आहे. तर इंग्लंडमध्ये रीस टोपले आणि जेमी ओव्हरटन या दोघांना संधी देण्यात आली आहे. तर साकीब महमूद आणि जॉन टर्नर या दोघांना बाहेर करण्यात आलं आहे.

पहिल्या 2 सामन्यात काय झालं?

उभयसंघातील सलामीचा सामना हा 31 ऑक्टोबरला झाला. यजमान विंडिजने या सामन्यात विजयी सलामी दिली. विंडिजने हा सामना डीएलएसनुसार 8 विकेट्सने जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे इंग्लंडसाठी दुसरा सामना हा ‘करो या मरो’ असा झाला. इंग्लंडने 2 नोव्हेंबरला झालेल्या या दुसर्‍या सामन्याक विंडिजवर 5 विकेट्सने विजय मिळवत पहिल्या पराभवाचा वचपा घेतला. इतकंच नाही, तर मालिकेत 1-1 ने बरोबरीही केली. त्यामुळे आता मालिका कोण जिंकणार? याची उत्सुकता ही क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.

कोण जिंकणार सीरिज?

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन: शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), ब्रँडन किंग, एविन लुईस, केसी कार्टी, शेरफेन रदरफोर्ड, शिमरॉन हेटमायर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोटी आणि अल्झारी जोसेफ

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : लियाम लिव्हिंगस्टोन (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), विल जॅक्स, जॉर्डन कॉक्स, जेकब बेथेल, सॅम करन, डॅन मौसली, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि रीस टोपले.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.