9 सिक्स, 9 फोर आणि 134 धावा….T20I पीचवर ‘या’ फलंदाजाने घातला धुमाकूळ

| Updated on: Aug 15, 2022 | 1:53 PM

T 20 म्हणजे फास्ट क्रिकेट. इथे धावांचा पाऊस पडतो. टी 20 क्रिकेट मध्ये फलंदाजांकडून चौकार-षटकारांचा पाऊस पहायला मिळतो. न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने वेस्ट इंडिज विरुद्ध अशीच फलंदाजी केली.

9 सिक्स, 9 फोर आणि 134 धावा....T20I पीचवर या फलंदाजाने घातला धुमाकूळ
glenn phillips
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: T 20 म्हणजे फास्ट क्रिकेट. इथे धावांचा पाऊस पडतो. टी 20 क्रिकेट मध्ये फलंदाजांकडून चौकार-षटकारांचा पाऊस पहायला मिळतो. न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने वेस्ट इंडिज विरुद्ध अशीच फलंदाजी केली. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने खोऱ्याने धावा केल्या. न्यूझीलंडच्या टीमने कॅरेबियाई भूमीवर 3 सामन्यांची टी 20 सीरीज जिंकली. या विजयात ग्लेन फिलिप्सची भूमिका महत्त्वाची राहिली. ग्लेन फिलिप्स या सीरीज मधला सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने 9 षटकार आणि 9 चौकारांसह 134 धावा केल्या. त्याने एकूण 78 चेंडूंचा सामना केला. त्याचा स्ट्राइक रेट 172 चा होता.

प्लेयर ऑफ द सीरीज ग्लेन फिलिप्स

वेस्ट इंडिज विरुद्ध 3 सामन्यांच्या टी 20 सीरीज मध्ये ग्लेन फिलिप्स प्लेयर ऑफ द सीरीज ठरला. वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीज मध्ये चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा बनवण्याची ग्लेन फिलिप्सची ही पहिली वेळ नाहीय. वर्ष 2020 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीज मध्ये त्याने 130 धावा फटकावल्या होत्या.

वेस्ट इंडीज विरुद्ध 3 T20 सामन्यात फिलिप्सच प्रदर्शन

वेस्ट इंडिज विरुद्ध तीन टी 20 सामन्याच्या सीरीज मध्ये पहिल्या सामन्यात ग्लेन फिलिप्स अपयशी ठरला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने 41 चेंडूत 76 धावा फटकावल्या. तिसऱ्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यात त्याने 26 चेंडूत 41 धावा फटकावल्या.

या वर्षातला न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी फलंदाज

व्हाइट बॉल क्रिकेट आणि खासकरुन टी 20 मध्ये ग्लेन फिलिप्स या वर्षातला न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 2022 मध्ये न्यूझीलंडसाठी T 20I क्रिकेट मध्ये 53 पेक्षा जास्त सरासरी आणि 145 च्या स्ट्राइक रेटने धावा बनवल्या आहेत.

शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा विजय

ग्लेन फिलिप्सने 26 चेंडूत 41 धावा केल्या. पण शेवटच्या टी 20 सामन्याच वेस्ट इंडिजने न्यूझीलंडचा 8 विकेटने पराभव केला. पण न्यूझीलंडने ही मालिका 2-1 अशी जिंकली. तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 20 षटकात 7 विकेट गमावून 145 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने फक्त 2 विकेट गमावून 6 चेंडू आधीच लक्ष्य गाठले.