Rohit sharma वर ‘या’ फलंदाजाचा 1 चौकार, 1 षटकार आणि 15 धावा भारी पडल्या

T 20 क्रिकेटच्या इंटरनॅशनल पीचवर एक सामना सुरु आहे. ही तिरंगी लढत आहे. या शर्यतीत रोहित शर्मा आघाडीवर होता. पण आता त्याच्यावर एका फलंदाजाचा एक चौकार, एक षटकार आणि 15 धावा भारी पडल्या आहेत.

Rohit sharma वर 'या' फलंदाजाचा 1 चौकार, 1 षटकार आणि 15 धावा भारी पडल्या
Rohit sharma Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 1:19 PM

मुंबई: T 20 क्रिकेटच्या इंटरनॅशनल पीचवर एक सामना सुरु आहे. ही तिरंगी लढत आहे. या शर्यतीत रोहित शर्मा आघाडीवर होता. पण आता त्याच्यावर एका फलंदाजाचा एक चौकार, एक षटकार आणि 15 धावा भारी पडल्या आहेत. अवघ्या 9 दिवसात रोहितने आपली आघाडी गमावली. रोहित शर्माला वेस्ट इंडिज दौऱ्यात आघाडी मिळाली होती. 14 ऑगस्टला झालेल्या एका सामन्यानंतर रोहित आता दुसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड टी 20 सीरीज मधला शेवटचा सामना 14 ऑगस्टला खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडचा ओपनर मार्टिन गप्टिलने 15 धावा करुन T 20I धावांच्या शर्यतीत रोहित शर्माला मागे टाकलं.

आंतरराष्ट्रीय T 20 क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावांवरुन मार्टिन गप्टिल आणि रोहित शर्मा मध्ये ही शर्यत आहे. ही तिरंगी लढत आहे. कारण या मध्ये एक नाव विराट कोहलीच सुद्धा आहे. विराट सध्यातरी तिसऱ्या स्थानावर आहे. खरी स्पर्धा मार्टिन गप्टिल आणि रोहित शर्मा मध्ये आहे.

फार मोठी इनिंग नाही, पण

मार्टिन गप्टिलने वेस्ट इंडिज विरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडसाठी 15 धावा केल्या. या दरम्यान त्याने 1 चौकार आणि 1 षटकार लगावला. 13 चेंडूची गप्टिलची इनिंग फार मोठी नाहीय. पण त्याने रोहित शर्माला मागे टाकलय.

टी 20 इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये मार्टिक गप्टिलच्या नावावर आता 121 सामन्यात 3497 धावा आहेत. रोहित शर्मा 3487 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गप्टिल आणि रोहित मध्ये 10 धावांच अंतर आहे. विराट कोहली 99 सामन्यानंतर 3308 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यात आणि टॉपवर असलेल्या गप्टिल मध्ये 189 धावांच अंतर आहे.

9 दिवसात रोहित मागे पडला

रोहित शर्मा शेवटचा टी 20 सामना 6 ऑगस्टला वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता. त्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय T 20 क्रिकेट मध्ये रोहित लीडिंग रनगेटर बनला होता. पण आता वेस्ट इंडिज विरुद्ध 3 सामन्यांच्या टी 20 सीरीज मध्ये मार्टिन गप्टिल पुढे निघून गेला आहे. त्याने बरोबर 9 दिवसांनी म्हणजे 14 ऑगस्टला रोहितला मागे टाकलं.

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.